सानियाला आला होता 'पॅनिक अटॅक'
सानियाने एका क्षणाला तिला आलेला 'पॅनिक अटॅक' आणि त्या वेळची तिची अवस्थाही व्यक्त केली. फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खानसोबतच्या एका खास संवादात सानियाने तिच्या 'सिंगल मदरहुड'च्या आव्हानांवर भाष्य केलं. एकट्या पालकासाठी मुलांना सांभाळणं अवघड असतं, असं सानिया म्हणाली.
सिंगल मदरचा खूपच अवघड प्रवास
advertisement
सानियाच्या धैर्याचे कौतुक करताना फराह खान म्हणाली की, सिंगल मदर असण्यापेक्षा अधिक कठीण काही नाही. हा खूपच अवघड प्रवास आहे. आपल्या सर्वांची स्वतःचा प्रवास असतो आणि आपल्याला आपल्यासाठी सर्वोत्तम असेल तेच निवडावं लागतं. सानियाने मान्य केलं की, मदरहुड, काम आणि बाकीचे आयुष्य यात संतुलन राखणे तिच्यासाठी खूप कठीण होतं.
सानिया अक्षरशः थरथर कापत होती
कठीण दिवसांची आठवण सांगताना सानिया म्हणाली की, एका निराशाजनक क्षणी तिला 'पॅनिक अटॅक' आला होता आणि ती अक्षरशः थरथर कापत होती. मी कॅमेऱ्यावर याचा उल्लेख करू इच्छित नाही, पण तू माझ्या सेटवर आलीस आणि त्यानंतर मला एका 'लाइव्ह शो'मध्ये जायचे होते. जर तू तिथे नसतीस, तर मी तो शो केला नसता, असं फराह खानशी बोलताना सानिया मिर्झाने सांगितलं. न्यूज 18 ला दिलेल्या दुसऱ्या एका इंटरव्यूमध्ये सानियाने मोठा खुलासा केला.
मलाही भीती वाटली होती...
दरम्यान, 'काहीही झाले तरी, तू हा शो करत आहेस,' असं फरानने मला सांगितलं, अशी आठवण सानियाने सांगितली. फराहने देखील तो प्रसंग आठवला आणि 'पॅनिक अटॅक' पाहून तिला भीती वाटल्याचं मान्य केलंय. मला देखील सानियाची परिस्थिती पाहून भीती वाटली होती, असंही फराह खानने म्हटलं आहे.
