इंग्लंड विरूद्ध पाच टेस्ट मालिके दरम्यान जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरून प्रचंड चर्चा झाली होती. याच वर्कलोडवर आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर
याने मोठं विधान केलं आहे. भारतीय क्रिकेटला आता जसप्रीत बुमराहसाठी एडजस्ट व्हायची गरज नाही.त्याऐवजी आता बुमराहला त्याच्या फिटनेस आणि गेम हिशोबाने एडजस्ट करावं लागेल,असे मांजरेकर स्पष्टच बोलला आहे.
advertisement
संजय मांजरेकरने इंग्रजी वृत्तपत्र हिदुस्तान टाईम्सच्या कॉलममध्ये लिहलं की, हा खेळ नेहमीच आरसा दाखवतो.तुम्ही कितीही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करा, खऱ्या गोष्टी समोर येतातच. त्यामुळे हे योगायोगापेक्षा कमी नाही आहे, कारण ज्या दोन टेस्ट सामन्यात बुमराह खेळला नाही, भारत तेच सामने जिंकला यावर मांजरेकरने भर दिला.
मांजरेकरांचा असा विश्वास आहे की कोणताही खेळाडू संघासाठी अपरिहार्य नाही. मांजरेकर यांनी जसप्रीत बुमराहवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि लिहिले की जर तो सलग दोन कसोटी सामनेही खेळू शकत नसेल तर त्याला आघाडीचा गोलंदाज म्हणून निवडू नये.मांजरेकरांच्या याच विधानाने मोठी खळबळ माजली आहे.
इंग्लंड विरूद्ध मालिकेने स्पष्ट केले की,विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू संघात नसले तरी भारत जिंकू शकतो.त्यामुळे निवड समीतीने कठोर निर्णय घ्यावे. तसेच जर तो सलग दोन टेस्ट सामने खेळत नसेल तर तो भारतीय संघाची पहिली पसंद असू शकत नाही. याउलट जे खेळाडू पुर्णताह फिट आहे आणि खेळण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे, अशांना निवडले पाहिजे असे मांजरेकर यांनी अजित आगरकर यांना सल्ला दिला आहे.
महान खेळाडू तोच असतो, जो 100 टक्के फिट असताना देखील संघासाठी योगदान देईल. त्यामुळे भारतीय क्रिकेटला बुमराहसाठी एडजस्ट व्हायची गरज नाही, याउलट बुमराहला स्वत:ला एडजस्ट करावं लागेल,असे मांजरेकरांनी ठणकावून सांगितलं.
दरम्यान जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरूद्ध मालिकेत तीन सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. ज्यामध्ये दोनदा त्याने पाच विकेट घेतल्या. आता त्याची आशिया कपसाठी निवड होते की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.एशिया कप पुढच्या महिन्यात संयुक्त अरब अमीरातच्या अबु धाबी आणि दुबई या शहरात खेळवली जाणार आहे.