राजस्थान रॉयल्स सोडणार?
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीपासून वेगळं होण्याची बातमी आल्यापासून हा मुद्दा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. अशातच संजू सॅमसनने आता मौन सोडलं आहे. रविचंद्रन अश्विनच्या 'कुट्टी स्टोरीज' या यूट्यूब पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान संजू सॅमसन याने राजस्थान रॉयल्सवर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. राजस्थान रॉयल्सने मला एक व्यासपीठ दिलं जिथं मी जगासमोर त्याची प्रतिभा दाखवू शकतो, असं संजू म्हणाला.
advertisement
संजू सॅमसन म्हणाला...
आरआर माझ्यासाठी जगापेक्षाही जास्त आहे. केरळमधील एका गावातील एका लहान मुलाला त्याची प्रतिभा दाखवायची होती. आणि मग राहुल सर आणि मनोज बडाले सरांनी मला एक व्यासपीठ दिलं. जेणेकरून मी उठून जगाला दाखवू शकेन की मी काय आहे. आरआरसोबतचा माझा प्रवास खरोखरच उत्तम राहिला आहे आणि अशा फ्रँचायझीचा भाग झाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. हे माझ्यासाठी खरोखर खूप अर्थपूर्ण आहे, असं संजू सॅमसन यावेळी म्हणाला.
संजू सॅमसनचा आयपीएल प्रवास
दरम्यान, संजू सॅमसन 2013 ते 2015 पर्यंत राजस्थानकडून खेळला. त्यानंतर तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) कडून दोन वर्षे खेळला. त्यानंतर तो 2018 मध्ये राजस्थानला परतला. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने 2022 मध्ये संघाला अंतिम फेरीत नेले. 2008 नंतर राजस्थान संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला. मागील वर्षी त्याने रियान परागला कॅप्टन्सी देत हात मोकळे केले होते, त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.