खरं तर व्हायरल व्हिडिओमध्ये 'माझं हृदय मी तुला देतेय...'असे ती बोलताना दिसत आहे.त्यामुळे सारा तेंडुलकर नेमकी कुणासाठी इतकी इमोशनल झाली आहे? अशी चर्चा रंगली आहे. खरं तर 5 मार्च 2026 ला अर्जुन तेंडुलकरचा सानिया चांडोकसोबत लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते.पण काही व्हिडिओ असे होते जे लग्नसमारंभातले समोर आलेच नव्हते.असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
अर्जून तेंडुलकरच्या लग्नात त्याची लाडकी बहीण खूप नटली होती.त्यामुळे त्या दिवशी देखील तिचे फोटो व्हायरल झाले होते. पण तिचा लग्नात एक व्हिडिओ समोरच आला नव्हता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर आपल्या लाडक्या भावासाठी इमोशनल होताना दिसली आहे. "माझा भाऊ माझे संपूर्ण हृदय आहे. म्हणून कृपया सानिया, त्याची काळजी घे, त्याच्यावर प्रेम कर, त्याची काळजी घे आणि त्याची काळजी घे. मला खात्री आहे की तो तुझ्यासाठीही असेच करेल, असे सारा तेंडुलकर बोलली आहे. हा अर्जून आणि सानियाच्या लग्नसमारंभातला व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर आपल्या भावाची तिच्या मैत्रिणीने अर्थात वहिनीने आयुष्यभराची साथ द्यावी,यासाठी असा संदेश दिला होता.
सचिन तेंडुलकरही झाला होता भावूक
सचिन तेंडुलकर त्याचा मुलगा अर्जुन आणि होणारी सून सानिया चांडोकला घेऊन प्री वेडींग सेलीब्रेशन करण्यासाठी जामनगरला पोहोचला होता. तिथे मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांनी मिळून जोडप्याला आशीर्वाद दिला.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला होती.
या सेलीब्रेशन दरम्यान सचिन तेंडुलकरने एक इमोशनल भाषण देखील दिलं होतं. जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो, आणि तिची ओळख करून देतो, तेव्हा कळतं आपला मुलगा मोठा झाला आहे,असे सचिन तेंडुलकर म्हणाला होता.
हे दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात.अर्जुन मला तुझ्यावर गर्व आहे, तुझ्या आयुष्यात इतकं खास कुणी आलं आहे.जो तुझ्यावर इतकं प्रेम करते आहे आणि तुही तिच्यावर खूप प्रेम करत आहे, सचिनचे हे शब्द ऐकुण अर्जुन तेंडुलकर सर्वांसमोर लाजला होता.
दरम्यान सचिन तेंडुलकर ज्यावेळेस अर्जून तेंडुलकर बाबत बोलत होता, तेव्हा त्याच्या मनात गर्वाची भावना होती.
