छत्रपती संभाजीनगर : खेळामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतो. खेळाडूंसाठी हा राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. हाच सर्वोच्च पुरस्कार छत्रपती संभाजीनगर शहरातील तलवारबाजीची खेळाडू कशिष भराड हिला जाहीर झाला आहे. यानिमित्ताने आतापर्यंत कशिषचा प्रवास कसा राहिला, याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल रिपोर्ट.
advertisement
कशिष दीपक भराड ही तलवारबाजीची खेळाडू आहे. कशिष सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजी महाविद्यालयात बीएस्सीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, त्यांच्या घराशेजारी एक मैदान आहे. त्या मैदानावर तलवारबाजीची एक अॅकॅडमी सुरू झाली होती. याविषयी मला माझा मैत्रिणीकडून माहिती मिळाली. त्या अॅकॅडमीमध्ये मी गेले आणि या ठिकाणी मी फक्त फिटनेससाठी ही अॅकॅडमी रुजू केली.
सुरुवातीला फक्त फिटनेससाठीच अॅकॅडमी ज्वाईन केली होती. पण हळूहळू मला या खेळामध्ये रुची निर्माण झाली. त्यासोबतच इथल्या शिक्षकांनी मला सांगितले की, हा एक ऑलिम्पिक गेम आहे. यामध्ये देखील तू चांगले करिअर करू शकते. त्यानंतर मी घरी आले. या तलवारबाजी विषयी अजून माहिती जाणून घेतली आणि मला कळले की, हा एक खूप चांगला खेळ आहे आणि मीदेखील हा खेळ खेळून यामध्ये आपले करिअर करू शकते. मग मी याच अॅकॅडमीमध्ये ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली.
या ठिकाणी मी साधारणपणे 1 वर्षभर या खेळाची ट्रेनिंग घेतली. त्यानंतर माझी साईमध्ये निवड झाली आणि आता साई स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. तर अशा पद्धतीने मी या तलवारबाजीच्या खेळामध्ये आली आहे, असे तिने लोकल18 शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसला 'व्हिनचॅट', नेमका कसा दिसतो हा पक्षी, photos
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न -
कशिष सांगते की, आता मला भारताकडून ऑलम्पिकमध्ये खेळायचा आहे आणि भारताला पदक मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी मी आतापासून तयारी करत आहे. मी सर्व मुलींना हेच सांगते की, तलवारबाजी हा एक खूप चांगला खेळ आहे. तुम्हीदेखील खेळून यामध्ये तुमचे करिअर करू शकता.
दरम्यान, कशिषने आत्तापर्यंत एकूण 87 मेडल जिंकले आहेत. त्यामध्ये तिला 2 इंटरनॅशनल मेडल तर एकूण 36 नॅशनल मेडल आणि राज्यस्तरावर तिला एकूण 49 मेडल जिंकले आहेत. त्यासोबतच कशिषने इयत्ता 6 ते 12 वैयक्तिक आणि संघिक राष्ट्रीय स्तरावर सलग सुवर्णपदक जिंकले आहेत. तिने यात विक्रमही केला आहे.
मला हा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. या यशात माझे आई वडील त्यासोबतच माझे सर्व शिक्षक यांचा खूप मोठे योगदान मला लाभले आहे, असे म्हणत तिने सर्वांचे आभारही मानले. कशिषला हा महाराष्ट्र शासनाचा खेळासाठीचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार भेटला आहे. एक आई वडील म्हणून आम्हाला तिचा खूप अभिमान आहे आणि तिला भविष्यामध्ये तिला भारतासाठी खेळायचा आहे. आम्ही सदैव तिच्या पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया कशिषचे वडील दीपक भराड यांनी दिला.