ज्या माणसाला क्रिकेट समजत नाही...
अख्तरने मोहसिन नकवी यांना 'नाकाबिल' आणि 'जाहिल' असे संबोधत पीसीबीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. "ज्या माणसाला क्रिकेटमधील काहीच समजत नाही, तो पीसीबीचा अध्यक्ष बनला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता? टीम कशी चालणार?", असा सवाल शोएब अख्तरने उपस्थित केला. तर पाकिस्तानच्या बॅटिंग ऑर्डरवर देखील त्याने नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या या लाजीरवाण्या पराभवामुळे अख्तरने बोर्डाच्या निवडीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
advertisement
जगातील सर्वात मोठा गुन्हा म्हणजे...
क्रिकेट न जाणणारा नक्वी पीसीबीचा अध्यक्ष झाला आहे, तो बाबरला सुपरस्टार म्हणतो आणि तो आपल्याला एकही सामना जिंकून देऊ शकत नाही, जगातील सर्वात मोठा गुन्हा म्हणजे अक्षम आणि अज्ञानी व्यक्तीला मोठी नोकरी देणं आहे, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. शोएब अख्तर याने यावेळी पाकिस्तानच्या बॅटिंगवर खडे बोल सुनावले. एकही बॅटर 50 धावा करू शकत नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, असंही शोएब अख्तर म्हणालाय.
दरम्यान, पाकिस्तानच्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी प्रचंड संतापला. पाकिस्तानचा डाव अवघ्या 114 रन्सवर आटोपल्याने आफ्रिदीने टीममधील बड्या खेळाडूंवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि बाबर आझम यांना टीममधून ड्रॉप करा, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे.
