श्रेयस अय्यरला अट घातली
टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या श्रेयस अय्यरला टीममध्य़े घेण्यासाठी बीसीसीआयने आपले नियम कायम ठेवले अन् त्याला अट घातली आहे. श्रेयस अय्यरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली मॅच फिटनेस सिद्ध करावी लागेल. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (COE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच तो 11 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होणाऱ्या मालिकेत खेळू शकणार आहे.
advertisement
मोहम्मद सिराजचे वनडे संघात पुनरागमन
दुसरीकडे, स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याला या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. पूर्ण 10 ओव्हर बॉलिंग करण्याची परवानगी COE कडून न मिळाल्याने निवड समितीने हा निर्णय घेतला. मात्र, विकेटकीपर ऋषभ पंत याने संघात आपली जागा मिळवण्यात यश मिळवलं आहे. अनुभवी बॉलर मोहम्मद शमी याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याच्या नावाचा विचार केला नाही, तर मोहम्मद सिराज याचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (व्हॉइस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होईल. त्यानंतर 14 जानेवारीला राजकोट आणि 18 जानेवारीला इंदूर येथे अखेरचा सामना खेळवला जाईल. घरच्या मैदानावर होणारी ही मालिका भारतासाठी वर्ल्ड कपची महत्त्वाची रंगीत तालीम ठरणार आहे.
