शुभमन गिल दुलीप ट्रॉफीतून बाहेर
भारतीय क्रिकेटचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिल दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे. वैद्यकीय टीमने दिलेल्या अहवालानुसार, गिलची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. गिलला उत्तर विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
9 सप्टेंबरपासून आशिया कप
advertisement
आशिया कप 2025 साठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून गिलची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे त्याची तब्येत ही टीम इंडियासाठी एक चिंतेची बाब बनली आहे. दुलीप ट्रॉफी 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, तर आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामुळे, बीसीसीआयने गिलच्या आरोग्याला प्राधान्य देत त्याला या देशांतर्गत स्पर्धेतून बाहेर राहण्याचा सल्ला दिला आहे.
दुखापतीतून वाचण्यासाठी खेळाडू आजारी
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत आता उत्तर विभागाची जबाबदारी अंकित कुमारकडे सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिलला सध्या व्हायरल तापाचा त्रास होत आहे. तो सध्या चंदीगड येथील त्याच्या घरी आराम करत आहे. आशिया कप सुरू होण्याआधी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. अनेकदा मोठ्या स्पर्धेआधी दुखापतीतून वाचण्यासाठी खेळाडू आजारी पडल्याचं पहायला मिळतंय. शुभमन गिलला देखील याचाच ताप आलाय का? असा सवाल विचारला जात आहे.