क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धा खेळण्याचे आदेश दिले, त्यानंतर या खेळाडूंनी त्यांच्या राज्य संघांना ते विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.
टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल, पंजाबसाठी 3 आणि 6 जानेवारीला खेळण्याची अपेक्षा आहे, ज्या दिवशी जयपूरमध्ये पंजाबचा सामना सिक्कीम आणि गोवा विरुद्ध होईल. भारतीय टीममध्ये सामील होण्यासाठी गिलला लवकरच पंजाबची साथ सोडावी लागेल. 11 जानेवारीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बडोद्यामध्ये पहिला वनडे सामना होणार आहे, यासाठी 7-8 जानेवारीला भारतीय टीम एकत्र येईल.
advertisement
जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एससीए) ला कळवले आहे की तो 6 आणि 8 जानेवारी रोजी सर्व्हिसेस आणि गुजरात विरुद्धचे सामने खेळणार आहे. सौराष्ट्र संघ सध्या कर्नाटकातील अलूर येथे त्यांचे लीग सामने खेळत आहे. तीन सामन्यांपैकी त्यांनी एक विजय मिळवला आहे आणि आठ टीमच्या गटात ते सहाव्या स्थानावर आहेत, ज्यामध्ये ऋषभ पंतची दिल्लीची टीम देखील आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) राहुल कोणते सामने खेळेल याची तात्काळ पुष्टी केलेली नाही, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो 3 आणि 6 जानेवारी रोजी अहमदाबाद येथे त्रिपुरा आणि राजस्थान विरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी खेळण्याची शक्यता आहे. कर्नाटक तीन सामन्यांमध्ये 100 टक्के विजयी रेकॉर्डसह गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने पुष्टी केली आहे की यशस्वी जयस्वाल जयपूरला पोहोचला आहे आणि तो बुधवारी (31 डिसेंबर) गोवा विरुद्ध मुंबईचा सामना खेळण्याची अपेक्षा आहे. जयस्वाल थोड्या काळासाठी आजारी होता आणि त्याला पहिले तीन सामने मुकावे लागले. मुंबईची टीम तीन विजयांसह ग्रुप सीमध्ये अव्वल स्थानावर आहे.
रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत पंतपर्यंत बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफी मध्ये खेळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेत सहभाग अनिवार्य केला आहे. बुमराह हा एकमेव अपवाद आहे जो विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत नाहीये. वर्क लोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. दोन सामने खेळलेला कोहली 6 जानेवारीला होणाऱ्या सामन्यासाठी दिल्लीच्या टीममध्ये परतणार आहे.
