अबरारचं हे सेलिब्रेशन पाहून वानिंदू हसरंगालाही राग अनावर झाला. यानंतर पुढच्या एका तासामध्येच हसरंगाने अबरारला त्याच पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं. अबरार विकेट मिळाल्यानंतर जसं सेलिब्रेशन करतो, अगदी तसंच सेलिब्रेशन हसरंगानेही केलं. सगळ्यात आधी फखर झमानचा कॅच पकडल्यानंतर हसरंगाने अबरारला कॉपी केलं. यानंतरही हसरंगा थांबला नाही, पुढे त्याने सॅम अयुब आणि सलमान आघाचीही विकेट घेतली आणि तसंच सेलिब्रेशन केलं.
advertisement
भर मैदानामध्ये वानिंदू हसरंगाचं हे सेलिब्रेशन पाहून अबरार अहमदचा चेहराही पडला. या सगळ्या वादाचे व्हिडिओही समोर आले आहेत.
श्रीलंकेकडून या सामन्यात कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 50 रन केले. तर असलंकाने 20 आणि करुणारत्नेने नाबाद 17 रनची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर हारिस राऊफ, हुसैन तलत यांना प्रत्येकी 2-2 आणि अबरार अहमदला एक विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमचं आशिया कपमधील आव्हान संपुष्टात येणार आहे.