हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा नितीश रेड्डी आहे. सध्या भारताचे कोणताही टेस्ट मालिका सूरू नाहीयेत,त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेट खेळतो आहे.या दरम्यान आंध्रप्रदेशकडून खेळताना नितीश रेड्डीने हॅट्ट्रीक विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्या या हॅट्ट्रीक विकेटसमुळे संघाला विजय मिळवता आला नाही.
खरं तर आंध्रप्रदेश प्रथम फलंदाजी करताना 112 धावांवर ऑलआऊट झाली होती. आंध्रप्रदेशकडून एकट्याने 39 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्यानंतर नितीश रेड्डीने 25 धावा केल्या होत्या. त्या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
दरम्यान आंध्रप्रदेशने दिलेल्या या 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्यप्रदेशची सुरूवात खराब झाली होती. कारण आंध्रप्रदेशकडून नितीश रेड्डी तिसरी ओव्हर घेऊन मैदानात आला होता. यावेळी रेड्डीने चौथ्या बॉलवर पहिल्यांदा हर्ष गवळीला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर पाचव्या बॉलवर हरप्रीत सिंग भाटीयाला विकेटमागे कॅच आऊट केले. त्यानंतर सहाव्या बॉलवर कर्णधार रजत पाटीदारला क्लिन बोल्ड केले. अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढले होते.
नितीश रेड्डीने हे विकेट काढून देखील काहीच फायदा झाला नाही.कारण रिषभ चौहानच्या 47 आणि राहुल बाथमच्या 35 धावांनी मध्यप्रदेशने हा सामना 4 विकेटसनी जिंकला आहे.
दरम्यान नितीश रेड्डी या टीम इंडियाच्या टेस्ट संघात होता. पण या मालिकेत ना त्याची बॅट चालली ना त्याची बॉलिंग चालली होती.त्यामुळे तो या मालिकेत अपयशी ठरला होता.
