श्रीलंका फायनलमध्ये कशी जाणार?
पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर आता श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या असून फायनलचा रस्ता अंधूक झाल्याचं पहायला मिळतंय. श्रीलंकेला फायनलमध्ये जाण्यासाठी मोठ्या उलटफेराची गरज आहे. श्रीलंकेला फायनलचं तिकीट हवं असेल तर श्रीलंकेला काहीही करून टीम इंडियाला मोठ्या फरकाने हरवावं लागेल. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट चांगला होईल. तसेच श्रीलंकेला बांगलादेशवर देखील अवलंबून रहावं लागणार आहे. जर बांगलादेशने पाकिस्तान तसेच भारताचा देखील पराभव केला तरच श्रीलंकेची फायनल खेळण्याची शक्यता आहे.
advertisement
बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...
बांगलादेशच्या टीमने भारताचा पराभव केला अन् त्यानंतर श्रीलंकेने देखील भारताचा पराभव केला तर पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत या तिन्ही संघांचे दोन पाईंट्स होतील. अशी परिस्थिती निर्माण झाली तर श्रीलंकेला चांगल्या नेट रनरेटच्या आधारावर फायनल खेळण्याची शक्यता आहे. परंतू याची शक्यता केवळ 1 टक्के आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
टीम इंडिया फायनलमध्ये जाणार?
दरम्यान, टीम इंडियासाठी फायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण सर्वात सोपं आहे. बांगलादेश किंवा श्रीलंकेला हरवलं तर ते अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतात. दोन्ही सामने गमावल्यास त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावं लागू शकतं. पण टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म पाहता टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, यात कोणतीही शंका उपस्थित होणार नाही.