TRENDING:

Steve Bucknor : अखेर बकासुराने मान्य केली चूक! क्रिकेटच्या देवाचा सर्वात मोठा दुश्मन अखेर गुडघ्यावर, म्हणाला 'मला पश्चाताप होतोय...'

Last Updated:

Steve Bucknor regret On Sachin Tendulkar LBW : स्टिव बकनर क्रिकेटचा सर्वात मोठा व्हिलन म्हणून सर्वांच्या मनात राहिला. अशातच याच क्रिकेटच्या बकासूराने मोठं वक्तव्य केलं अन् आपली चूक मान्य केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Steve Bucknor On Sachin Tendulkar : क्रिकेटच्या इतिहासात सचिन रमेश तेंडूलकर हे नाव नेहमी अजरामर राहिल यात शंका नाही. आजही सचिन स्टेडियममध्ये दिसला की, सचिन सचिन सचिन... नावाचा जयजयकार ऐकायला मिळतोय. सचिनने क्रिकेटला नव्या स्थरावर नेऊन ठेवलं. ज्यांनी सचिनच्या क्रिकेटचा काळ पाहिला, ज्यांच्या मनावर क्रिकेटच्या आठवणी कायमस्वरूपी कोरल्या केल्या आहेत. अशातच सचिन म्हटलं की एक नाव नेहमी ऐकायला मिळतंय ते म्हणजे स्टिव बकनर... तळपायाची आग मस्तकात जाईल, असं हे नाव क्रिकेटचा सर्वात मोठा व्हिलन म्हणून सर्वांच्या मनात राहिला. अशातच याच क्रिकेटच्या बकासूराने मोठं वक्तव्य केलं अन् आपली चूक मान्य केली आहे.
Steve Bucknor regret On Sachin Tendulkar LBW
Steve Bucknor regret On Sachin Tendulkar LBW
advertisement

माझ्याकडून दोन मोठ्या चुका झाल्या - बकनर

माझ्याकडून दोन मोठ्या चुका झाल्या. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या खेळाडूच्या विरोधात चुकीचा निर्णय देता, तेव्हा तो तुमच्या मनात कायम घर करून राहतो, असं स्टिव बकनर म्हणाला. आता अनेक वर्षांनंतर, बकनर याने एका मुलाखतीमध्ये आपल्या त्या चुकांची कबुली दिली असून त्याने 'मानवी चूक' असं म्हणत आपल्याच चुकांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळी त्याने दोन आठवणी ताज्या केल्या.

advertisement

सचिनला चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं

2003 साली ब्रिस्बेन टेस्ट सुरू असताना सचिनला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आलं होतं. जेसन गिलेस्पीच्या बॉलवर सचिनला चुकीच्या पद्धतीने LBW आऊट देण्यात आले होते. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की बॉल स्टंप्सच्या खूप वरून जात होता. तरीही सचिनने शांतपणे मैदानातून बाहेर जाणे पसंत केले आणि आपल्या खेळाचा दर्जा जपला होता. पण 2005 साली बकनरने तीच चूक केली.

advertisement

सचिनला कॅच आऊट दिलं

सिडनीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच सुरू असताना जेव्हा पाकिस्तानच्या अब्दुल रज्जाकच्या बॉलवर सचिनला कॅच आऊट देण्यात आलं. खरं तर, बॉल बॅटला टचही न करता लांबून गेला होता, तरीही बकनर यांनी बोट वर केलं अन् सचिनविरुद्ध निर्णय दिला होता.

बकनरसोबत खटके उडाले

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, या शाळेत नवा मुख्यमंत्री, कायं घडतंय? Video
सर्व पहा

दरम्यान, 1992 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या एका मॅचमध्येही बकनर यांनी सचिनला चुकीच्या पद्धतीने रन आऊट दिलं होतं. टीव्ही रिप्लेमध्ये सचिन नॉटआऊट असल्याचे दिसत असूनही, बकनर यांनी त्याला आऊट ठरवलं, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. तसेच एका सामन्यात सचिन 99 वर असताना बकनर याने सचिनला आऊट ठरवलं होतं. केवळ सचिनच नाही, तर इतर भारतीय खेळाडूंसोबतही बकनर यांचे खटके उडाले होते. सिडनी टेस्टच्या वादग्रस्त निर्णयांनंतर बीसीसीआयने आयसीसीकडे अधिकृत तक्रार केली होती. भारतीय टीमच्या वाढत्या दबावामुळे आयसीसीला अखेर स्टीव्ह बकनर यांना पुढच्या मॅचमधून हटवावे लागले होते.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Steve Bucknor : अखेर बकासुराने मान्य केली चूक! क्रिकेटच्या देवाचा सर्वात मोठा दुश्मन अखेर गुडघ्यावर, म्हणाला 'मला पश्चाताप होतोय...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल