TRENDING:

Suryakumar Yadav : इथं परिस्थिती काये! मॅच जिंकली पण सूर्याची एक चूक वर्ल्ड कप बुडवणार, LIVE मॅचमध्ये चक्क टाईमपास करत बसला

Last Updated:

Shivam Dube Bowling IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने विजय तर मिळवला पण कॅप्टन सूर्यकुमार यादवने यावेळी एक घोडचूक केली. त्याचे परिणाम टीम इंडियाला भोगावे लागू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs Zimbabwe : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मोठे उलटफेर होत असून टीम इंडियाने सुपर 8 मध्ये मोठा विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेचा पराभव करून टीम इंडियाने सेमीफायनलच्या दिशेने कूच केलीये. अशातच आता टीम इंडियाचा आत्मविश्वास देखील वाढला असून आगामी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार असून सेमीफायनलसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. अशातच सूर्याची एक चूक वर्ल्ड कप बुडवणार असं चित्र पहायला मिळतंय. झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यकुमार घेतलेला एक निर्णय चुकीचा ठरलाय.
Suryakumar Yadav big mistake in IND vs ZIM
Suryakumar Yadav big mistake in IND vs ZIM
advertisement

शिवम दुबेची बॉलिंग

टी-20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये शिवम दुबेची बॉलिंग भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सूर्याने सहावा बॉलर वापरला. कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याला 15 व्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॉल सोपवला, परंतु ही ओव्हर चक्क 10 बॉलची पडली. या ओव्हरमध्ये दुबेने तब्बल 26 रन्स खर्च केले, ज्यामध्ये 3 वाईड आणि 1 नो-बॉलचा समावेश होता. या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेच्या बॅट्समननी दुबेला 2 सिक्स आणि 2 फोर मारत जेरीस आणले. टीम इंडियासाठीच नव्हे तर टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय बॉलरची ही सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे.

advertisement

टीम इंडियाचा नेट रनरेट

इतक्या मोठ्या स्पर्धेत अशा प्रकारची खराब बॉलिंग टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकते, असं दुबेच्या कामगिरीवरून दिसून येतंय. जर सूर्याने रेग्युलर बॉलर्सचा वापर करून ओव्हर पूर्ण केल्या असत्या तर टीम इंडियाचा नेट रनरेट चांगला वाढला असता. आगामी सामना कोलकातामध्ये आहे. तर कोलकातामध्ये पाऊस आला तर नेट रनरेटवरून टीम्स क्वालिफाय होतील. पावसाने मॅचमध्ये घोळ घातला तर जास्त नेट रनरेटमुळे वेस्ट इंडिज सेमीफायनलला जाईल. सूर्याला ही गोष्ट माहिती असायला हवी होती. टीम इंडियाने 100 हून अधिक मार्जिनने सामना जिंकला असता तर टीम इंडियाचा नेट रनरेट चांगलाच सुधारला असता.

advertisement

नॉक आऊट सामना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना थेट नॉक आऊट सामना असणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये जाणार आहे. पण जर या मॅचमध्ये पावसाने घोळ घातला तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये हा सामना खेळवला जाणार असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : इथं परिस्थिती काये! मॅच जिंकली पण सूर्याची एक चूक वर्ल्ड कप बुडवणार, LIVE मॅचमध्ये चक्क टाईमपास करत बसला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल