पाकिस्तानची आयसीसीकडे तक्रार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील विजय ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केल्याबद्दल आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केल्याबद्दल सूर्यकुमार यादव याच्यावर पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. अशातच आता आयसीसीने ही तक्रार नोंदवून घेतली आहे.
advertisement
आशिया कपची फायनल खेळणार की नाही?
सूर्यकुमारची तक्रार नोंदवल्याने आता टीम इंडियाच्या कॅप्टनला उत्तर द्यावं लागणार आहे. आयसीसीला सूर्याचं उत्तर योग्य वाटलं तर सूर्यकुमारवर कारवाई होणार नाही. पण आयसीसीने कारवाई केली तर सूर्या आशिया कपची फायनल खेळणार की नाही? यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण सूर्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं पहायला मिळत आहे. सूर्याने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये केलेलं वक्तव्य राजकीय असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, हे प्रकरण बहुधा लेव्हल 1 चा गुन्हा मानला जाईल. लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यास बंदी घातली जात नाही, तर सामना शुल्काच्या काही टक्के दंड आकारला जातो. जर गुन्हा लेव्हल 2, 3 किंवा 4 चा गुन्हा असेल तरच बंदी घातली जाते. याचा अर्थ सूर्यकुमार यादववर बंदी घालण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्याला दंड होऊ शकतो.