TRENDING:

'2020 ला जसं मी...', T20 World Cup 2026 साठी कॅप्टनची खास तयारी, सूर्याने काढलं जुनं हत्यार!

Last Updated:

Suryakumar Yadav On batting Form : सूर्याने स्पष्ट केलं की, सध्या तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असून आपली बॅटिंग योग्य दिशेने जात असल्याचं मत त्याने व्यक्त केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs NZ T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित टी-20 सीरिजचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. या सीरिजमधील पहिला मॅच बुधवारी 21 जानेवारी रोजी म्हणजेच आज नागपूरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या मॅचच्या पूर्वसंध्येला भारतीय टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने आपल्या बॅटिंग फॉर्मबद्दल प्रांजळ मत व्यक्त केलं असून, या वक्तव्याने आता क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Suryakumar Yadav On batting Form
Suryakumar Yadav On batting Form
advertisement

जसं मी 2020 मध्ये खेळत होतो...

सूर्याने स्पष्ट केलं की, सध्या तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असून आपली बॅटिंग योग्य दिशेने जात असल्याचं मत त्याने व्यक्त केलं. मात्र, जर या सीरिजमध्ये अपेक्षित रन आले नाहीत, तर तो पुन्हा एकदा मैदानात परतायला तयार आहे. याचाच अर्थ असा की, अपयश आल्यास तो आपल्या तयारीचे नव्याने आकलन करेल आणि पूर्णपणे नवीन प्लॅनिंग करून मैदानात उतरेल. जसं मी 2020 मध्ये खेळत होतो, त्याच पद्धतीने खेळण्याचा माझा मानस आहे, असंही सूर्या यावेळी म्हणाला.

advertisement

तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन

गेल्या काही काळापासून सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या लौकिकाला साजेसा परफॉर्मन्स करता आलेला नाही. तरीही टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. स्वतःला सातत्याने चॅलेंज देणं ही सूर्याची खासियत असून, गरज पडल्यास आपल्या तंत्रात आणि दृष्टिकोनात बदल करण्यास तो मागे हटणार नाही, असंही त्याने यावेळी आवर्जून नमूद केलं. तसेच न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन खेळणार असल्याचं सूर्याने स्पष्ट केलं अन् आपलं जुनं हत्यार काढलं.

advertisement

सूर्याची आकडेवारी

आकडेवारीवर नजर टाकली तर 2025 हे वर्ष सूर्यासाठी बॅटिंगच्या दृष्टीने फारसे चांगले ठरलेले नाही. त्याने खेळलेल्या 21 मॅचच्या 19 इनिंग्समध्ये केवळ 218 रन केले असून त्याची सरासरी 13.62 इतकी कमी राहिली आहे. त्याचा स्ट्राईक रेट देखील 123.16 असा खाली आला आहे, जो त्याच्या नैसर्गिक आक्रमक खेळाच्या अगदी उलट असल्याचे दिसून येते.

advertisement

पाच मॅचची सीरिज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन मित्रांनी ठरवलं! बिझनेस आयडियाने सगळ्यांचं मन जिंकलं, मुंबईतच नाही तर परराज्
सर्व पहा

दरम्यान, आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही पाच मॅचची सीरिज भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. टीम इंडियाच्या विजयासाठी कॅप्टन सूर्याचा फॉर्ममध्ये परतणं अनिवार्य आहे. बुधवारी होणाऱ्या पहिल्या बॉल पासूनच सूर्यकुमार यादव एका मोठ्या खेळीच्या इराद्याने मैदानात उतरेल, अशी आशा तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'2020 ला जसं मी...', T20 World Cup 2026 साठी कॅप्टनची खास तयारी, सूर्याने काढलं जुनं हत्यार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल