TRENDING:

Pakistan vs India : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या बायलॅट्रल मॅच व्हायला हव्यात का? पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्याने एका वाक्यात विषय संपवला!

Last Updated:

Suryakumar Yadav On india vs pakistan bilateral series : एका पाकिस्तानी पत्रकाराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बायलॅट्रल सिरीजवर प्रश्न केला. त्यावर सूर्याने झटकन उत्तर दिलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs pakistan bilateral series : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 सर्वात रोमांचक सामना रविवार, 15 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी सूर्याने टीम इंडियाच्या रणनितीवर काही प्रश्नांना बदल दिली तर प्लेइंग इलेव्हनवर काही हिंट दिल्या आहेत. अशातच आता सूर्याने पाकिस्तानी पत्रकाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Suryakumar Yadav On IND vs PAK bilateral series
Suryakumar Yadav On IND vs PAK bilateral series
advertisement

मी जेव्हा त्या पोझिशनमध्ये असेल तेव्हा... - सूर्या

पाकिस्तानी पत्रकार देखील सूर्यकुमार यादवच्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सूर्याला घेरण्याचा प्रयत्न केला पण सूर्यकुमारने त्यांच्या प्रश्नावर सिक्सर फिरवले. यावेळी एका पाकिस्तानी पत्रकाराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बायलॅट्रल सिरीजवर प्रश्न केला. त्यावर सूर्याने झटकन उत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तान रेग्युलर मॅचेस खेळत नाही. पण या गोष्टी माझ्या हातात नाहीत. मी जेव्हा त्या पोझिशनमध्ये असेल तेव्हा मी तुम्हाला याचं उत्तर देऊ शकतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

advertisement

पाहा सूर्याची प्रेस कॉन्फरेन्स

बहिष्कार टाकण्याचं नाटक

मागील आठवड्यात, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जवळपास एक आठवडा या मॅचवर बहिष्कार टाकण्याचे नाटक केलं, परंतु शेवटी त्यांनी आपल्या निर्णयावरून 'यू-टर्न' घेतला. या संपूर्ण वादाच्या काळात अशा चर्चा रंगल्या होत्या की, पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने टीम इंडियासोबत द्विपक्षीय क्रिकेट सीरिज खेळण्याची मागणी करण्यात आल्याचे बोलले जात होते, ज्यामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

advertisement

भारतासोबत खेळण्यावर यु-टर्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
400 वर्षांपूर्वीचे मंदिर,असतो शिव पार्वतीचा विवाह सोहळा, इतिहास माहितीये का? ‎
सर्व पहा

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची गरिबी पाहता आता त्यांना बीसीसीआयसमोर हातपाय पसरवण्याची गरज पडू लागली आहे. याची प्रचिती तेव्हाच होते, तेव्हा पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यावर यु-टर्न घेतला. आयसीसीने तंबी दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान खाली घालून खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan vs India : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या बायलॅट्रल मॅच व्हायला हव्यात का? पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्याने एका वाक्यात विषय संपवला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल