सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना हलवला
भारताचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे आयोजकांना गुरुवारी मोठा निर्णय घ्यावा लागला. हैदराबाद येथील जिमखाना मैदानासारख्या सामान्य ठिकाणाहून सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना अधिक सुरक्षित असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Rajiv Gandhi International Stadium) हलवण्यात आला.
advertisement
अनपेक्षित गर्दी आणि सुरक्षेती चिंता
हार्दिकच्या उपस्थितीमुळे झालेली अनपेक्षित गर्दी आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दुखापतीतून सावरल्यानंतरचा हार्दिकचा हा केवळ दुसराच स्पर्धात्मक सामना होता. आगामी 5 मॅचच्या टी-20 सीरीजमध्ये तो 9 डिसेंबरपासून कटक येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
प्रेक्षकांची संख्या अंदाजापेक्षा खूप जास्त
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संघ थांबलेले हॉटेल, सराव नेट आणि तिकीट खिडक्यांजवळ नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. ही गर्दी स्थानिक मॅचेसच्या प्रेक्षकांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रेक्षकांची संख्या आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त होती. सुरक्षा आणि सामना सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही सामना राजीव गांधी स्टेडियममध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. पंजाबविरुद्ध नाबाद 77 धावा केल्यानंतर, हार्दिकने गुजरातविरुद्ध 10 धावा केल्या आणि एक विकेट घेतली होती.
