TRENDING:

T-20 Cricket : गोलंदाजांचा पालापोचाळा, 19 षटकार, 51 चेंडूत 151 धावांची वादळी खेळी

Last Updated:

Finn Allen Creates History With 19 sixes : एका फलंदाजाच्या वादळी खेळीत गोलंदाजांचा पालापोचाळा झाला. या वादळी खेळीत फलंदाजाने काही विक्रम मोडीत काढले आहे. न्यूझीलंडच्या मैदानात ही वादळी खेळी साकारली गेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: क्रिकेटमध्ये गोलंदाजांऐवजी फलंदाजांना झुकतं माप दिल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे एका फलंदाजाच्या वादळी खेळीत गोलंदाजांचा पालापोचाळा झाला. या वादळी खेळीत फलंदाजाने काही विक्रम मोडीत काढले आहे. न्यूझीलंडच्या मैदानात ही वादळी खेळी साकारली गेली.
News18
News18
advertisement

न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर फिन ऍलनने 2025 च्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) सामन्यात षटकारांचा वर्षाव करून कहर केला. त्याने वैयक्तिक आणि सांघिक विक्रमांची एकहाती नोंद केली. 296 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना, त्याने शुक्रवारी (13 जून) ऑकलंडमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून 51 चेंडूत 151 धावांची खेळी साकारली. या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

advertisement

फिन ऍलनने या सामन्यात त्याच्या डावात एकूण 19 षटकार आणि फक्त 5 चौकार मारले. याचा अर्थ षटकारांची संख्या चौकारांच्या तिप्पट होती. जे आतापर्यंतच्या कोणत्याही टी-20 डावात सर्वाधिक षटकार आहे. हा विक्रम यापूर्वी साहिल चौहानच्या नावावर होता. जून 2024 मध्ये त्याने एस्टोनियाकडून सायप्रसविरुद्ध एकूण 18 षटकार लगावले होते. 2023 मध्ये डलास येथे सिएटल ऑर्कासविरुद्ध एमआय न्यू यॉर्ककडून निकोलस पूरनने बनवलेला हा एमएलसीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती.

advertisement

विक्रम मोडीत काढले...

अ‍ॅलनने विशेषतः बेन सीयर्स आणि रचिन रवींद्र यांना लक्ष्य केले. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 4 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याने 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील 14 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 34 चेंडूत केलेले हे शतक एमएलसीच्या इतिहासातील सर्वात जलद शतक होते. फिनने वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनचा 40 चेंडूंचा विक्रम मोडला. न्यूझीलंडच्या खेळाडूने केलेले हे सर्वात जलद टी-20 शतक देखील होते.

advertisement

त्याने 49 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसचा 52 चेंडूत 150 धावांचा विक्रम मोडला. एकूणच, हा टी-20 मधील 15 वी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. अॅलनच्या या खेळीमुळे त्याच्या संघाला पहिल्या डावात 5 बाद 269 धावांचा डोंगर रचला. 18 व्या षटकात मिशेल ओवेनने त्याला बाद केले.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T-20 Cricket : गोलंदाजांचा पालापोचाळा, 19 षटकार, 51 चेंडूत 151 धावांची वादळी खेळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल