झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी श्रीलंकेविरुद्धचा हा सामना जिंकणं गरजेचं आहे. सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. करो या मरो साठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांनी वादळी सुरूवात करून दिली. या दोघांमध्ये 8.3 ओव्हरमध्येच 104 रनची पार्टनरशीप झाली. ट्रॅविस हेडने 29 बॉलमध्ये 56 आणि मिचेल मार्शने 27 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली, पण या दोघांच्या विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली.
advertisement
जॉश इंग्लिसने 27 आणि ग्लेन मॅक्सवेलने 22 रन केले. श्रीलंकेकडून दुशन हेमंताने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय दुष्मंता चमिराला 2 विकेट मिळाल्या. महीश तीक्षणा, दुनीथ वेलालागे आणि कामिंदू मेंडिस यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा विक्रम
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 पेक्षा जास्त रनची ओपनिंग पार्टनरशीप झाल्यानंतर एखादी टीम ऑलआऊट झाली आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात चौथ्यांदा हा नकोसा रेकॉर्ड झाला आहे. याशिवाय आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशाचा 100 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाल्यानंतर ऑलआऊट होण्याची ही दुसरी वेळ आहे, याआधी 2024 साली मिरपूरमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध बांगलादेशचा 143 रनवर ऑलआऊट झाला होता, त्या सामन्यात बांगलादेशला 101 रनची ओपनिंग पार्टनरशीप मिळाली होती.
