दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात हर्षित राणाने फक्त एक ओव्हर बॉलिंग केली, यामध्ये त्याने 16 रन दिले. दुखापतीमुळे हर्षित राणा बाहेर झाल्यानंतर त्याच्याऐवजी फास्ट बॉलर मोहम्मद सिराजची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
मोहम्मद सिराज हा भारताच्या 2024 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता. 2024 वर्ल्ड कपच्या युएसएमध्ये झालेल्या ग्रुप स्टेजच्या 3 सामन्यांमध्ये सिराज खेळला होता, यानंतर वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या राऊंडमध्ये सिराजऐवजी कुलदीप यादव टीममध्ये आला होता.
advertisement
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने वर्ल्ड कपच्या पत्रकार परिषदेमध्येच हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मागच्या काही काळात हर्षित राणाने बॉलिंगच नाही तर बॅटिंगमध्येही योगदान दिलं आहे.
याआधी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही वर्ल्ड कपच्या आधी दुखापत झाली होती. तिलक वर्मावर तर न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी शस्त्रक्रियाही करण्यात आली. या दुखापतीतून तिलक वर्मा सावरलेला असून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सराव सामनाही खेळला. वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीबाबत मात्र बीसीसीआयकडून अजून कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), मोहम्मद सिराज, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर
