TRENDING:

T20 World Cup : कोकणातला मुलगा वर्ल्ड कप फायनलमध्ये झळकणार... भारत-न्यूझीलंडचा फैसला करणार!

Last Updated:

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. या सामन्यात कोकणचा सुपूत्र भारत आणि न्यूझीलंड यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. रिचर्ड एलिंगवर्थ आणि ऍलेक्स वार्फ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मैदानातले अंपायर असतील, तर अल्लाहुदीन पालेकर थर्ड अंपायर, एड्रियन होल्डस्टॉक फोर्थ अंपायर आणि ऍन्डी पायक्रॉफ्ट मॅच रेफ्री असतील.
कोकणातला मुलगा वर्ल्ड कप फायनलमध्ये झळकणार... भारत-न्यूझीलंडचा फैसला करणार!
कोकणातला मुलगा वर्ल्ड कप फायनलमध्ये झळकणार... भारत-न्यूझीलंडचा फैसला करणार!
advertisement

पालेकरांचं मूळ कोकणातलं

अंपायर अल्लाहुदीन पालेकर यांचं कुटुंब मूळचं रत्नागिरीचं आहे. पालेकर यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तहसीलमधील शिव गावात आहे. अल्लाहुदीन पालेकर यांचे वडील नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थलांतरित झाले. अल्लाहुदीन यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये झाला, पण त्यांचं मूळ गाव खेडमधील शिव आहे.

'संपूर्ण गाव, ग्रामपंचायत (स्थानिक प्रशासकीय संस्था) यांना त्यांचा अभिमान आहे की आमचे आणि गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. आम्हाला खूप आनंद आहे', अशी प्रतिक्रिया शिव गावाचे स्थानिक नागरिक दुर्वेश पालेकर यांनी दिली.

advertisement

44 वर्षांच्या पालेकर यांनी 2014/15 रणजी ट्रॉफीच्या मोसमात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अंपायर म्हणून काम पाहिले. मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातल्या लीग स्टेजच्या सामन्यात पालेकर कृष्णमाचारी श्रीनिवासन यांच्यासोबत अंपायर होते.

एलिट पॅनलमध्ये एन्ट्री

अल्लाहुदीन पालेकर यांची मार्च 2025 मध्ये आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये एन्ट्री झाली. 'मी 2016 मध्ये अंपायर म्हणून काम करायला सुरूवात केली, त्यानंतर 2009 मध्ये प्रथम श्रेणी पॅनलमध्ये स्थान मिळवलं, यानंतर तब्बल 16 वर्षांनी मला एलिट पॅनलमध्ये येता आलं. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी बराच काळ घालवला आहे. माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं आहे', अशी प्रतिक्रिया अल्लाहुदीन पालेकर यांनी आयसीसी एलिट पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर दिली.

advertisement

'मी जेव्हा अंपायर म्हणून करिअरला सुरूवात केली, तेव्हा मला या पॅनलमध्ये स्थान मिळवायचं होतं, कारण जगभरातले फक्त 12 अंपायर या पॅनलमध्ये आहेत. माझ्या करिअरमधला हा प्रतिष्ठेचा क्षण आहे', असं पालेकर म्हणाले.

अल्लाहुदीन पालेकर यांनी 2018 मध्ये पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना, 2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना आणि 2020 मध्ये पहिल्या टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग केली.

advertisement

'2015 मध्ये मी निराश झालो होतो, मला वाटलं होतं तितक्या वेगाने माझी प्रगती होत नव्हती, पण तरीही मी धीर सोडला नाही. ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकतो त्यावर नियंत्रण ठेवायचं मी ठरवलं. अंपायरिंगची कारकीर्द सुरू केल्यानंतर तुम्ही 10 वर्षात एलिट पॅनलमध्ये येणार नाही. तुम्हाला स्वतःला थोडा वेळ द्यावा लागेल', असा सल्ला पालेकर यांनी अंपायरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना दिला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक वर्ष अंपायरिंग केल्यानंतर या अनुभवाचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभराटीसाठी होईल, असा विश्वास पालेकर यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही, तर स्थानिक क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना कठीण परिक्षेचा सामना करावा लागतो, असं पालेकर यांना वाटतं. 'जेव्हा मी अंपायरिंगला सुरूवात केली, तेव्हा सध्या दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार बरेच खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते. या खेळाडूंसमोर तरुण अंपायर म्हणून उभं राहणं आणि निर्णय देणं, मला खूप कठीण वाटलं होतं', असं पालेकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : कोकणातला मुलगा वर्ल्ड कप फायनलमध्ये झळकणार... भारत-न्यूझीलंडचा फैसला करणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल