TRENDING:

T20 World Cup : न्यूझीलंडच्या कॅप्टनने आपल्याच टीमचा घात केला, फायनलच्या पहिल्या बॉलआधीच केलं सरेंडर!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने धमाका उडवून दिला आहे. 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 5 विकेट गमावून 255 रन केल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने धमाका उडवून दिला आहे. 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 5 विकेट गमावून 255 रन केल्या. पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 92 रन केले, तर 7.2 ओव्हरमध्येच भारतीय टीमच्या 100 रन पूर्ण झाल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पॉवरप्लेचा हा सर्वाधिक स्कोअर होता, तसंच टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने इतक्या जलद 100 रन केल्या आहेत. अभिषेकने 18 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, 21 बॉलमध्ये 52 रन करून अभिषेक आऊट झाला, त्याच्या या वादळी खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
न्यूझीलंडच्या कॅप्टनने आपल्याच टीमचा घात केला, फायनलच्या पहिल्या बॉलआधीच केलं सरेंडर!
न्यूझीलंडच्या कॅप्टनने आपल्याच टीमचा घात केला, फायनलच्या पहिल्या बॉलआधीच केलं सरेंडर!
advertisement

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात 7.1 ओव्हरमध्ये 98 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमच्या ओपनरमध्ये 50 रनची पार्टनरशीप झाली आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये न्यूझीलंडने केलेल्या बदलामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या सामन्यात न्यूझीलंडने कोल मॅकॉन्की याच्याऐवजी जेकब डफीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. ऑफ स्पिनर असलेला मॅकॉन्की हा टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकला असता. मॅकॉन्कीने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. मॅकॉन्कीच्या या एका ओव्हरमुळे न्यूझीलंड फायनलला पोहोचली, पण फायनलमध्येच त्यांनी मॅकॉन्कीला बाहेर केलं.

advertisement

या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा हा संघर्ष करत होता. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला होता, तसंच झिम्बाब्वेविरुद्धच्या अर्धशतकाशिवाय इतर सामन्यांमध्येही त्याला संघर्ष करावा लागला. यातल्या बहुतेक सामन्यांमध्ये ऑफ स्पिनरनीच अभिषेकची विकेट घेतली.

इतर टीमची ही रणनीती न्यूझीलंडने अभिषेक शर्माविरुद्धही वापरली, त्यांनी ऑफ स्पिनर ग्लेन फिलिप्सला पहिली ओव्हर दिली, पण अभिषेकचं ग्लेन फिलिप्सविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं आहे. फिलिप्सला आतापर्यंत एकदाही अभिषेकची विकेट घेता आली नव्हती. या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विन यानेही मॅकॉन्की टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो, असं सांगितलं होतं, पण न्यूझीलंडने त्यालाच टीमबाहेर करून जेकब डफीला संधी दिली.

advertisement

अभिषेक शर्माचं जेकब डफीविरुद्धचं रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. अभिषेकने डफीविरुद्ध 4 इनिंगच्या 22 बॉलमध्ये 52 ची सरासरी आणि 236.36 च्या स्ट्राईक रेटने 52 रन केले. संजूने 46 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 89 रन केले, तर इशान किशनने 25 बॉल 54 रन केले. यानंतर बॅटिंगला आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. तर हार्दिक पांड्या 13 बॉल 18 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबेने 8 बॉलमध्ये नाबाद 26 रनची खेळी केली.

advertisement

सॅन्टनरची खराब कॅप्टन्सी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा
सर्व पहा

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याच्या कॅप्टन्सीवरही यावरून टीका होत आहे. अभिषेक शर्मा हा पूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑफ स्पिनर्सविरुद्ध संघर्ष करत असताना सॅन्टनरने ग्लेन फिलिप्सला फक्त एकच ओव्हर दिली, तसंच मिचेल सॅन्टनर हा स्वत: आठव्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला, तोपर्यंत टीम इंडियाचा स्कोअर 100 च्या पार गेला होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : न्यूझीलंडच्या कॅप्टनने आपल्याच टीमचा घात केला, फायनलच्या पहिल्या बॉलआधीच केलं सरेंडर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल