न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून तब्बल 255 रनचा डोंगर उभारला, या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 19 ओव्हरमध्ये फक्त 159 रनवर ऑलआऊट झाला.
पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. अहमदाबादच्या मैदानात भारतीय खेळाडूंनी तिरंगा घेऊन व्हिक्ट्री परेड केली आणि मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले. टीम इंडियाचा बॅटर तिलक वर्मा तिरंगा घेऊन मैदानात व्हिक्ट्री लॅप करत होता, तेव्हा तिरंगा मैदानात पडला. तिलकच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्याने लगेच तिरंगा उचलला आणि तो कपाळाला लावून माफीही मागितली. तिलक वर्माचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्याच्या कृतीचं चाहते कौतुक करत आहेत.
advertisement
तिलक वर्माचं कमबॅक
टी-20 वर्ल्ड कपच्या आधी तिलक वर्मावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर वर्ल्ड कपच्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये तिलक वर्मा संघर्ष करत होता, अखेर टीम मॅनेजमेंटने तिलकला खालच्या फळीत बॅटिंगला पाठवलं यानंतर त्याने धमाका केला. तिलकने 8 इनिंगमध्ये 28.42 च्या सरासरीने आणि 155.46 च्या स्ट्राईक रेटने 199 रन केले.
