TRENDING:

IND vs NZ Final : सेमीफायनलचा 'हिरो' ठरणार फायनलचा व्हिलन? मॅचआधी जसप्रीत बुमराहने वाढवलं कॅप्टन सूर्याचं टेन्शन!

Last Updated:

Jasprit Bumrah vs New Zealand Statistics : जसप्रीत बुमराहने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली धाक निर्माण केली असली, तरी किवी संघाविरुद्ध त्याचे रेकॉर्ड्स थोडं खालावलेलं दिसतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs New Zealand, T20 World Cup Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये जसप्रीत बुमराहने 18 व्या ओव्हरमध्ये टाकलेला तो स्पेल आजही सर्वांच्या लक्षात आहे. इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर असताना बुमराहने मॅच फिरवली आणि भारताला फायनलचे तिकीट मिळवून दिलं. आता फायनलमध्ये पुन्हा एकदा बुमराहकडून अशाच चमत्काराची अपेक्षा 1.4 बिलियन भारतीयांना आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धची त्याची आजवरची आकडेवारी पाहता, टीम इंडियासाठी हे आव्हान सोपं नसेल असं चित्र दिसत आहे.
jasprit Bumrah vs New Zealand Statistics
jasprit Bumrah vs New Zealand Statistics
advertisement

किवी संघाविरुद्ध रेकॉर्ड्स खालावलं

जसप्रीत बुमराहने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली धाक निर्माण केली असली, तरी किवी संघाविरुद्ध त्याचे रेकॉर्ड्स थोडं खालावलेलं दिसतं. आकडेवारीनुसार, बुमराहचा जो नैसर्गिक दबदबा इतर टीम्सवर असतो, तो न्यूझीलंडसमोर कमी होताना दिसतो. टेस्ट असो वा वनडे, बुमराहचा बॉलिंग एव्हरेज आणि स्ट्राईक रेट न्यूझीलंडविरुद्ध अचानक खेळताना वाढतो, म्हणजेच बुमराहला विकेट्स मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो.

advertisement

बुमराहचा चिंतेचा विषय

जर आपण सविस्तर आकडेवारी पाहिली, तर टेस्टमध्ये बुमराहचा करिअर एव्हरेज 19.79 आहे, जो न्यूझीलंडविरुद्ध थेट 45.44 वर पोहोचतो. वनडेमध्ये देखील हीच परिस्थिती असून 23.55 वरून हा एव्हरेज न्यूझीलंडविरुद्घ 39.20 होतो. टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्येही त्याचे करिअर आकडे 18.57 वरून न्यूझीलंडविरुद्घ 23.37 पर्यंत जातात. तसेच त्याचा स्ट्राईक रेट देखील न्यूझीलंडविरुद्ध खेळताना वाढलेला दिसून येतो, जो भारतीय फॅन्ससाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

advertisement

जुने रेकॉर्ड्स मोडीत काढण्यासाठी सज्ज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरी बेताची परिस्थिती, ठरवलं 'अधिकारी व्हायचं'; सालगड्याच्या पोरानं करून दाखवलं
सर्व पहा

दरम्यान, भारतीय खेळपट्ट्यांवर बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध 8 मॅचेसमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. इथे त्याचा एव्हरेज 28.25 असून इकोनॉमी रेट 7.79 राहिला आहे. या स्पर्धेत बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 7 मॅचेसमध्ये 15.90 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 6.60 असून तो भारतासाठी सर्वात यशस्वी ठरला आहे. न्यूझीलंड हा एकमेव असा संघ आहे ज्यांच्याविरुद्ध बुमराहचे आकडे थोडे खालावलेले दिसतात. मात्र, अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे त्याचे घरचे मैदान असल्याने तो आज जुने रेकॉर्ड्स मोडीत काढण्यासाठी सज्ज असेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : सेमीफायनलचा 'हिरो' ठरणार फायनलचा व्हिलन? मॅचआधी जसप्रीत बुमराहने वाढवलं कॅप्टन सूर्याचं टेन्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल