काय आहे व्हिडिओमध्ये?
टी-20 वर्ल्ड कप हा नाट्यमय वळणावर पोहोचला आहे, कारण इराण आणि आखाती देशांमध्ये वाढत्या तणावामुळे सेमी फायनलवर संकट ओढावलं आहे, असं या व्हिडिओमध्ये म्हटलं गेलं आहे.
इराणमधील चिघळलेली परिस्थिती आणि दुबई ट्रान्झिट संकट आंतरराष्ट्रीय प्रवास आणि लॉजिस्टिक्सवर परिणाम करत आहे, ज्यामुळे स्पर्धेच्या सुरळीत आयोजनाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्याची भू-राजकीय परिस्थिती आयसीसीच्या कामकाजावर, प्रसारण लॉजिस्टिक्सवर, टीमच्या हालचालींवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनलवर परिणाम करू शकते, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
advertisement
विमानतळ बंद होण्याच्या धोक्यापासून ते आपत्कालीन नियोजनापर्यंत, प्रत्येक मोठ्या घडामोडींचे तपशीलवार विश्लेषण या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे. आयसीसी वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू ठेवू शकेल का, की सेमी फायनल आणि फायनल पुढे ढकलल्या जाणार? असे प्रश्न या व्हिडिओमध्ये उपस्थित केले गेले.
व्हिडिओमागील सत्य काय आहे?
खरं तर, सध्या सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ बनावट बातम्या पसरवत आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलबाबत या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती खोटी आहे. News18 ने ब्रॉडकास्टिंग टीममध्ये काम करणाऱ्या सदस्यासोबत चर्चा केली, ज्यात त्यांनी मॅचला कोणताही धोका नाही, सामना वेळापत्रकानुसारच होईल, असं सांगितलं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला हा व्हिडिओ खोटा असल्याचं स्पष्ट होत आहे.
