TRENDING:

T20 World Cup : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यातही पाऊस ठरणार व्हिलन? अहमदाबादमधून आली मोठी अपडेट!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपचा सुपर-8 चा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. कोलंबोमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यामध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपचा सुपर-8 चा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. कोलंबोमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यामध्ये एकही बॉल टाकला गेला नाही. टॉस सुरू असतानाच पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे अंपायर आणि मॅच रेफ्रीनी सामना रद्द केला. यानंतर आता रविवारी सुपर-8 मध्ये दोन सामने होणार आहेत. दुपारी 3 वाजता इंग्लंड आणि श्रीलंका आणि संध्याकाळी 7 वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होईल.
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यातही पाऊस ठरणार व्हिलन? अहमदाबादमधून आली मोठी अपडेट!
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यातही पाऊस ठरणार व्हिलन? अहमदाबादमधून आली मोठी अपडेट!
advertisement

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुकाबला होणार आहे. या सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कसं असणार अहमदाबादचं हवामान?

पाकिस्तान-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी, भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅक्यूवेदरच्या मते, रविवार, 22 फेब्रुवारी रोजी सामन्यादरम्यान आकाश पूर्णपणे स्वच्छ राहील, त्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे. दिवसाचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे, संध्याकाळपर्यंत तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. चाहते भारत-दक्षिण आफ्रिका सुपर 8 सामना पूर्ण 40 ओव्हरचा पाहू शकतील.

advertisement

भारतीय टीम अजिंक्य

भारतीय क्रिकेट टीम 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमध्ये अजिंक्य राहिली आहे. भारतीय टीमने त्यांचे चारही सामने जिंकले. दरम्यान, दक्षिण आफ्रिका ग्रुप डी मध्ये अपराजित राहिली. यानंतर आता या दोन्ही सर्वोत्तम टीम सुपर-8 मध्ये एकमेकांना भिडतील. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमधल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात उतरेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे, कर्णधार सूर्यकुमार यादव हा सामना हलक्यात घेणार नाही. दरम्यान, अभिषेक शर्मा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. अभिषेकने तीन सामने खेळले आहेत, तरीही त्याला एकही रन करता आलेली नाही. दरम्यान टी-20 मधला नंबर वन बॉलर वरुण चक्रवर्ती सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, जो दक्षिण आफ्रिकेसाठी अडचणीचा ठरू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यातही पाऊस ठरणार व्हिलन? अहमदाबादमधून आली मोठी अपडेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल