भारताविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते चांगलेच संतापले आहेत. टीममधले दोन जावई आणि बाबर आझमला ताबडतोब टीममधून बाहेर काढा, अशी मागणी पाकिस्तानी चाहतीने केली आहे. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानची ही चाहती स्टेडियमच्या बाहेर आली आणि तिने खेळाडूंवर टीकास्त्र डागलं.
'चूक काय झाली माहिती नाही, पण मी एक गोष्ट सांगते. शाहिन आफ्रिदी आणि शादाब खानवर बंदी घाला. टीममध्ये जे दामाद खान तुम्ही ठेवले आहेत, यांना तर आधी बाहेर काढा. दुसरं म्हणजे यांना सेव्हन स्टार हॉटेल, यांना देश फिरवा, यांना बर्थ डेचे पिझ्झे खायला द्या. यांना मजा करायला द्या, पण एक काम जे यांना करायचं असतं ते म्हणजे खेळणं, पण ते यांच्याकडून होत नाही', असं पाकिस्तानी चाहती म्हणाली.
advertisement
'एक तर तुम्ही सन्मानाने पराभूत व्हा, पण तुम्ही तर अपमान होऊन हरलात, भारतीय चाहत्यांनाही हे आवडलं नाही. निदान स्पर्धा तर करा. ज्या गोष्टींचे पैसे मिळतात, ते कामही नीट करत नाहीत. शाहिन, शादाब आणि बाबर या तिघांवर बंदी घाला. शाहिन आणि शादाबला टीममधून काढा, याकडे याचिका म्हणून पाहा. टीममध्ये जावई नकोत, बस खूप झालं. ट्विटरवर हा ट्रेंड सुरू करा', अशी मागणीही तिने केली आहे.
शाहिन-शादाब कुणाचे जावई?
शाहिन आफ्रिदी ही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा जावई आहे, तर शादाब खान हा पाकिस्तानचा माजी स्पिनर शकलेन मुश्ताकचा जावई आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर खुद्द शाहिद आफ्रिदीनेही त्याचा जावई शाहिन आफ्रिदीला टीमबाहेर करण्याची मागणी केली आहे.
