TRENDING:

T20 world Cup च्या फायनलपूर्वी राडा! क्विंटन डी कॉक ICC वर भडकला, एका गोष्टीवरून घातला धिंगाणा

Last Updated:

T20 world Cup 2026 Quinton de Kock : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अद्याप कोलकात्यात अडकलेले असताना, इंग्लंडचा संघ त्यांच्या आधी मायदेशी रवाना होत असल्याबद्दल डी कॉकने आश्चर्य व्यक्त केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Quinton de Kock frustration over ICC : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही फायनल खेळवली जाईल. मात्र, दुसरीकडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या टीम्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेस्ट इंडीज, साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड या टीमला अजूनही भारतातून जाता आलं नाहीये. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेटकीपर-बॅटर क्विंटन डी कॉक याने इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलवर गंभीर आरोप करत आपला संताप व्यक्त केला आहे.
Quinton de Kock frustration over ICC
Quinton de Kock frustration over ICC
advertisement

डी कॉकने आश्चर्य व्यक्त केलं

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अद्याप कोलकात्यात अडकलेले असताना, इंग्लंडचा संघ त्यांच्या आधी मायदेशी रवाना होत असल्याबद्दल डी कॉकने आश्चर्य व्यक्त केलं. आयसीसीच्या या दुजाभावामुळे डी कॉकने सोशल मीडियावर आपली नाराजी उघड केली. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने खंत व्यक्त केली अन् आयसीसीवर टीका देखील केली आहे.

advertisement

आयसीसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

क्विंटन डी कॉकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत आयसीसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्विंटन डी कॉकने लिहिले की, "हे खूपच मजेशीर आहे की आयसीसीकडून आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, इंग्लंडचा संघ आमच्या आधी कसा काय मायदेशी निघत आहे? वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेचे खेळाडू अजूनही अंधारात आहेत." क्विंटन डी कॉकच्या या स्टोरीमुळे साऊथ अफ्रिकेचे खेळाडू अडचणीत असल्याचं पहायला मिळतंय.

advertisement

हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, जगभरात इस्राईल आणि ईराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे हाहाकार उडवला आहे. या युद्धामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय दळणवळणाला ब्रेक जरी लागला असला तरी देखील आयसीसीने खेळाडूंची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. आयसीसीने देखील खेळाडूंना लवकरात लवकर रवाना करण्याचं आश्वासन दिलंय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 world Cup च्या फायनलपूर्वी राडा! क्विंटन डी कॉक ICC वर भडकला, एका गोष्टीवरून घातला धिंगाणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल