वानखेडेच्या खेळपट्टीवर हिरवं गवत दिसत आहे, ज्यामुळे खेळपट्टी फास्ट बॉलरना मदत करेल असा अंदाज आहे. याच खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातली सेमी फायनल झाली तर फास्ट बॉलर वर्चस्व गाजवू शकतात. या सामन्याच्या 24 तास आधी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर पिच क्युरेटरवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
टीम इंडियाने मंगळवार 3 मार्चला वानखेडे स्टेडियमवर सराव केला, तेव्हा टीमचा हेड कोच गौतम गंभीरही तिथे होता. टीमची प्रॅक्टिस सुरू असतानाच गंभीरने पिच क्युरेटरची भेट घेतली, या भेटीदरम्यान गंभीर नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, याचा फोटोही समोर आला आहे. गौतम गंभीर वानखेडेच्या खेळपट्टीवरून नाराज असल्याचं बोललं जात आहे.
टीम इंडियाला इंग्लंडचं आव्हान
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी बॅटिंगसाठी ओळखली जाते, पण खेळपट्टीवर हिरवं गवत असेल तर फास्ट बॉलरना मदत मिळेल. तसंच संध्याकाळनंतर अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे फास्ट बॉलरना स्विंगही जास्त मिळतो ज्यामुळे फास्ट बॉलर आणखी भेदक होतील. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये कित्येक वर्षांपासून खेळत असल्याने त्यांना इथली परिस्थिती चांगली माहिती आहे, त्यामुळे इंग्लंड सेमी फायनलमध्ये टीम इंडियासाठी मोठं आव्हान ठरू शकते.
