टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून तब्बल 255 रन केले. भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 19 ओव्हरमध्ये फक्त 96 रनवर ऑलआऊट झाला आणि टीम इंडियाने ट्रॉफीवर कब्जा केला. टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकणारा सूर्या हा टीम इंडियाचा तिसरा कर्णधार ठरला आहे, याआधी 2007 साली एमएस धोनी आणि 2024 साली रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली होती.
advertisement
भारताला वर्ल्ड कप विजेता कॅप्टन झाल्यानंतरही सूर्याला टीममध्ये जागा मिळालेली नाही. टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या 24 तासांमध्येच आयसीसीने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपची टीम जाहीर केली आहे, या टीममध्ये सूर्याला कॅप्टन्सीच काय पण टीममधूनही बाहेर ठेवण्यात आलं आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवची कामगिरी निराशाजनक झाली. फायनलमध्ये सूर्या पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला, त्यामुळे सूर्याला आयसीसीच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.
आयसीसीच्या या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमकडे आयसीसीच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
साहिबजादा फरहान (पाकिस्तान)
साहिबजादा फरहानने टी-20 वर्ल्ड कपच्या 7 सामन्यांमध्ये 76.60 च्या सरासरीने आणि 160.25 च्या स्ट्राईक रेटने 383 रन केल्या. एकाच वर्ल्ड कपमध्ये 2 शतकं आणि एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रमही फरहानने केला.
संजू सॅमसन (भारत)
संजूने 5 सामन्यांमध्ये 80.25 च्या सरासरीने आणि 199.37 च्या स्ट्राईक रेटने 321 रन केल्या. वेस्ट इंडिजविरुद्धची करो या मरो मॅच, सेमी फायनल आणि फायनल अशा लागोपाठ 3 सामन्यांमध्ये संजूने 3 अर्धशतकं केली.
इशान किशन (भारत)
इशान किशनने 9 सामन्यांमध्ये 193.29 चा स्ट्राईक रेट आणि 35.22 च्या सरासरीने 317 रन केले. पाकिस्तानविरुद्ध आणि फायनलमध्येही इशानने धमाकेदार अर्धशतकं केली.
एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका)
एडन मार्करमने 8 सामन्यांमध्ये 47.66 ची सरासरी आणि 165.31 च्या स्ट्राईक रेटने 286 रन केले.
हार्दिक पांड्या (भारत)
हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्ड कपच्या 9 सामन्यांमध्ये 160.74 च्या स्ट्राईक रेटने 217 रन केल्या, तसंच त्याने 9 विकेटही घेतल्या.
विल जॅक्स (इंग्लंड)
इंग्लंडच्या विल जॅक्सने 8 सामन्यांमध्ये 176.56 च्या स्ट्राईक रेटने 226 रन केल्या, याशिवाय त्याने 9 विकेटही घेतल्या आहेत.
जेसन होल्डर (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने 7 सामन्यांमध्ये 10 विकेट घेतल्या तसंच 141 रनही केल्या.
जसप्रीत बुमराह (भारत)
जसप्रीत बुमराहने 8 सामन्यांमध्ये 6.21 च्या इकोनॉमी रेटने आणि 12.42 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या.
लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लुंगी एनगिडीने 7 सामन्यांमध्ये 15.58 ची सरासरी आणि 7.19 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या.
आदिल रशीद (इंग्लंड)
इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने 8 सामन्यांमध्ये 19.23 च्या सरासरीने आणि 8.15 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या.
ब्लेसिंग मुझरबानी (झिम्बाब्वे)
झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानीने 6 सामन्यांमध्ये 14.46 च्या सरासरी आणि 7.88 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट मिळवल्या.
शॅडली व्हॅन श्चालक्विक (युएसए)
युएसएच्या शॅडली व्हॅन श्चालक्विक याला आयसीसीने बारावा खेळाडू ठेवला आहे, त्याने फक्त 4 सामन्यांमध्ये 7.76 ची सरासरी आणि 6.80 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या.
आयसीसीची टी-20 वर्ल्ड कपची टीम
साहिबजादा फरहान, संजू सॅमसन, इशान किशन, एडन मार्करम (कर्णधार), हार्दिक पांड्या, विल जॅक्स, जेसन होल्डर, जसप्रीत बुमराह, लुंगी एनगिडी, आदिल रशीद, ब्लेसिंग मुझरबानी, शॅडली श्चालक्विक (बारावा खेळाडू)
