वेस्ट इंडिजने याआधी 2012 आणि 2014 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या ग्रुपमध्ये इंग्लंड, इटली, नेपाळ आणि स्कॉटलंड या टीम आहेत. बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर शेवटच्या क्षणी स्कॉटलंडच्या टीमची वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री झाली आहे.
वेस्ट इंडिजचे खेळाडू हे जगभरातल्या टी-20 लीगमध्ये एकहाती मॅच फिरवताना दिसतात, आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये हेच खेळाडू धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये शाय होप, शेमरन हेटमायर, जेसन होल्डर, रोव्हमन पॉवेल, शरफेन रदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक खेळाडू आहेत.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचं वेळापत्रक
वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड- 7 फेब्रुवारी, कोलकाता
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड- 11 फेब्रुवारी, मुंबई
वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ- 15 फेब्रुवारी, मुंबई
वेस्ट इंडिज विरुद्ध इटली- 19 फेब्रुवारी, कोलकाता
वेस्ट इंडिजची टीम
शाय होप (कर्णधार), शिमरन हेटमायर, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्डे, जेसन होल्डर, अकील हुसैन, शामर जोसेफ, ब्रॅन्डन किंग, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, शरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड
