TRENDING:

T20 World Cup : ICC ने दिला टीम इंडियाला धोका! उलटफेर करणारी टीम भारताविरुद्ध उतरवली, 26 तारखेला कुणासोबत मॅच?

Last Updated:

Team India super 8 schedule : ग्रुप बीमध्ये झिम्बॉब्वेने सर्वांना धक्का देत पाईंट टेबलचं अव्वल स्थान गाठलं आहे. काल झालेल्या सामन्यात झिम्बॉब्वेने दुसरा उलटफेर केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Team india schedule Changes : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील सर्वच्या सर्व मॅचेस जिंकल्यानंतर टीम इंडिया आता सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. ग्रुप ए मधून टीम इंडियाने पाकिस्तान, युएसए, नेदरलँडला हरवल्यानंतर आता सुपर 8 च्या लढती अधिक टफ होणार आहेत. अशातच आता टीम इंडियाचं सुपर 8 चं शेड्युल समोर आलंय. पण आयसीसीने मोठा घोळ घातलाय. वर्ल्ड कपमध्ये उलटफेर करणारा संघ टीम इंडियाविरुद्ध उतरवला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पहायला मिळतंय.
Team india schedule Changes as Zimbabwe
Team india schedule Changes as Zimbabwe
advertisement

श्रीलंकेला सुपर 8 च्या ग्रुप बीमध्ये ढकललं

ग्रुप बीमध्ये झिम्बॉब्वेने सर्वांना धक्का देत पाईंट टेबलचं अव्वल स्थान गाठलं आहे. काल झालेल्या सामन्यात झिम्बॉब्वेने दुसरा उलटफेर केला. झिम्बॉब्वेने श्रीलंकेचा पराभव करत सुपर 8 मध्ये आपली जागा फिक्स केली आहे. झिम्बॉब्वेने 4 पैकी 3 सामने जिंकल्यानंतर आता आयसीसीने मात्र कोणताही बदल केला नाही. आयसीसीने श्रीलंकेला सुपर 8 च्या ग्रुप बीमध्ये ढकललं असून झिम्बॉब्वे भारताविरुद्ध येत्या 26 तारखेला खेळणार आहे.

advertisement

22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅच

टीम इंडियाची सुपर-8 मधील पहिली मॅच 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. ही मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाईल. 2024 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल, तर भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

advertisement

26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध सामना

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मॅच 26 फेब्रुवारी रोजी चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. झिम्बाब्वे सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्यांनी ग्रुप स्टेजमधील 4 पैकी 3 मॅचेस जिंकल्या आहेत (एक मॅच पावसामुळे रद्द झाली). सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील या टीमला हलक्यात घेणे टीम इंडियासाठी धोक्याचे ठरू शकते.

advertisement

वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर मॅच

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

दरम्यान, सुपर-8 चा शेवटचा अडथळा 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजच्या रूपाने असेल. ही मॅच कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवली जाईल. वेस्ट इंडिजनेही ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रुपमधील टॉप 2 टीम्स थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरतील, त्यामुळे प्रत्येक मॅच आता अत्यंत महत्त्वाची आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ICC ने दिला टीम इंडियाला धोका! उलटफेर करणारी टीम भारताविरुद्ध उतरवली, 26 तारखेला कुणासोबत मॅच?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल