33 वर्षांच्या करुण नायरने आपल्याला दुसरी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर त्याची इंग्लंड दौऱ्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी निवड झाली होती, पण नायरला या संधीचं सोनं करता आलं नाही. इंग्लंड दौऱ्यात करुण नायर 4 टेस्ट मॅच खेळला, यात त्याने 25 च्या सरासरीने फक्त 205 रन केल्या. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 8 इनिंगमध्ये करुण नायरला फक्त एक अर्धशतक करता आलं. ओव्हलमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये करुण नायरने 57 रन केले होते.
advertisement
करुण नायरने 8 वर्षांनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे नायरसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे झाले, पण इंग्लंड दौऱ्यात चमक दाखवता न आल्यामुळे करुण नायरला पुन्हा एकदा टीम इंडियातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. क्रिकबझने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
करुण नायरच्या ऐवजी देवदत्त पडिक्कलची भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड होऊ शकते. पडिक्कलने काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध लखनऊमध्ये 150 रनची खेळी केली होती. करुण नायरशिवाय ऋषभ पंतचीही टीम इंडियामध्ये निवड होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. इंग्लंड दौऱ्यात पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर पंत अजूनही फिट झालेला नाही. पंतऐवजी ध्रुव जुरेल आणि एन जगदीशन हे दोन विकेट कीपर असतील.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टेस्ट 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादमध्ये तर 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीमध्ये खेळवली जाणार आहे.
भारताची संभाव्य टेस्ट टीम
शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, नितीश रेड्डी, एन जगदीशन