सीताफळ रबडीसाठी लागणारे साहित्य
तीन ते चार मध्यम आकाराच्या सीताफळाचा गर काढून घ्यायचा, साखर, एक लिटर दूध, केशर, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड एवढेच साहित्य यासाठी आपल्याला लागेल.
नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी सोपी आणि चवदार रेसिपी, झटपट बनवा सोयाबीनच्या दाण्याचा झुणका
सीताफळ रबडी बनवण्याची कृती
सर्वप्रथम सीताफळाचा गर काढून घ्यायचा. सीताफळाचा गर काढणं थोडं अवघड असतं. तर त्यासाठी तुम्ही चॉपरमध्ये सीताफळाचा गर टाकायचा आणि हाताने ओढायचं. यासाठी इलेक्ट्रिक चॉपर वापरायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही सीताफळाचा गर काढू शकता. तर सगळ्यात पहिले एक लिटर दुधाला उकळी आणून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. कारण की सीताफळ गोड असतात त्यामुळे साखर बेताने टाकावी. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड, केसर आणि ड्रायफ्रूट टाकायचे. आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते रूम टेंपरेचरला थंड करून घ्यायचं.
advertisement
जे मिश्रण तयार झालेलं आहे ते रूम टेंपरेचरला थंड करून घेतल्यानंतरच त्यामध्ये सीताफळाचा गर टाकायचा आहे. गरम असताना आपण जर त्यामध्ये हा गर टाकला तर आपलं दूध फाटू शकतं. थंड झाल्यानंतर गर टाकायचा आणि एक तासभर त्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर तुमची सीताफळ रबडी बनवून तयार होते. अगदी बनवायला सोपी आहे तर तुम्ही देखील घरी एकदा नक्की ट्राय करा.