Sitaphal Rabdi Recipe : नवरात्रीच्या उपवासासाठी करा सीताफळ रबडी, झटपट तयार होईल टेस्टी रेसिपी, संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्राचे नऊ दिवस आपल्यापैकी काही जणांना उपवास असतो.
छत्रपती संभाजीनगर : नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्राचे नऊ दिवस आपल्यापैकी काही जणांना उपवास असतो. उपवासाला आपण गोड पदार्थांमध्ये फक्त साबुदाण्याची खीर किंवा रताळ्याचा शिरा खातो पण जर तुम्हाला छान टेस्टी आणि झटपट होणारं काही खायचं असेल तर तुम्ही सीताफळाची रबडी करू शकता. अगदी कमी वेळात ही रबडी तयार होते आणि बनवायला देखील सोपी आहे. ऋतुजा पाटील यांनी याची रेसिपी सांगितली आहे.
सीताफळ रबडीसाठी लागणारे साहित्य
तीन ते चार मध्यम आकाराच्या सीताफळाचा गर काढून घ्यायचा, साखर, एक लिटर दूध, केशर, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड एवढेच साहित्य यासाठी आपल्याला लागेल.
सीताफळ रबडी बनवण्याची कृती
advertisement
सर्वप्रथम सीताफळाचा गर काढून घ्यायचा. सीताफळाचा गर काढणं थोडं अवघड असतं. तर त्यासाठी तुम्ही चॉपरमध्ये सीताफळाचा गर टाकायचा आणि हाताने ओढायचं. यासाठी इलेक्ट्रिक चॉपर वापरायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही सीताफळाचा गर काढू शकता. तर सगळ्यात पहिले एक लिटर दुधाला उकळी आणून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. कारण की सीताफळ गोड असतात त्यामुळे साखर बेताने टाकावी. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड, केसर आणि ड्रायफ्रूट टाकायचे. आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते रूम टेंपरेचरला थंड करून घ्यायचं.
advertisement
जे मिश्रण तयार झालेलं आहे ते रूम टेंपरेचरला थंड करून घेतल्यानंतरच त्यामध्ये सीताफळाचा गर टाकायचा आहे. गरम असताना आपण जर त्यामध्ये हा गर टाकला तर आपलं दूध फाटू शकतं. थंड झाल्यानंतर गर टाकायचा आणि एक तासभर त्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर तुमची सीताफळ रबडी बनवून तयार होते. अगदी बनवायला सोपी आहे तर तुम्ही देखील घरी एकदा नक्की ट्राय करा.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 23, 2025 5:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Sitaphal Rabdi Recipe : नवरात्रीच्या उपवासासाठी करा सीताफळ रबडी, झटपट तयार होईल टेस्टी रेसिपी, संपूर्ण Video