बांगलादेशचा पराभव केल्यास टीम इंडिया...
भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ आहेत. भारतीय टीमने यापूर्वीच एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. उद्याच्या मॅचमध्ये विजय मिळवून 4 पॉइंट्ससह थेट फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचं लक्ष्य आहे. बांगलादेशचा आज पराभव केल्यास टीम इंडियाच्या खात्यात चार गुण दिसतील. त्यामुळे फायनलचं तिकीट तर निश्चित होईल. पण टीम इंडिया पाईंट्स टेबलच्या पहिल्या क्रमांकावर असेल की दुसऱ्या हे निश्चित असणार नाही.
advertisement
श्रीलंका आजच बॅग भरणार
जर आज टीम इंडिया जिंकली तर श्रीलंकेला आजच बॅग पॅक करून मायदेशी रवाना व्हावं लागेल. पण बांग्लादेश आज जिंकली तर श्रीलंकेच्या आशा जिवंत राहतील. बांगलादेशने आज सामना जिंकला तर बांगलादेशचं सेमीफायनल तिकीट निश्चित होणार आहे. तर बांगलादेशच्या विजयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - सैफ हसन, तंजीद हसन, लिटन दास (कॅप्टन आणि विकेटकीपर), तौहीद ह्रदय, शमीम हुसैन, जाकिर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, तंजीम हसन आणि मुस्तफिजुर रहमान.