TRENDING:

IND vs ENG : एका कॉलने वर्ल्ड कपची अख्खी मॅच फिरली, वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी मॅचनंतर सगळंच सांगितलं

Last Updated:

आयसीसीच्या अंडर 19 वर्ल्डकप वर टीम इंडियाने सहाव्यांदा नाव कोरलं आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. टीम इंडियाच्या या जबरदस्त खेळीनंतर आता सर्वस्तरावरून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षात होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Team India won ICC Under 19 World cup 2026 : आयसीसीच्या अंडर 19 वर्ल्डकप वर टीम इंडियाने सहाव्यांदा नाव कोरलं आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. टीम इंडियाच्या या जबरदस्त खेळीनंतर आता सर्वस्तरावरून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षात होतो आहे. यासोबत खेळाडूंच्या कुटुंबियांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यात वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया पाहून एका कॉलने अख्खी मॅच फिरल्याचे स्पष्ट होत आहे.
vaibhav sooryavanshi father first reaction
vaibhav sooryavanshi father first reaction
advertisement

भारताच्या या वर्ल्ड कप विजयानंतर स्टार स्पोर्टवर वैभव सूर्यवंशीच्या वडिलांशी बातचीत करण्यात आली. यावेळी वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी सांगितले की, वर्ल्डकप फायनलपूर्वी माझं वैभवशी बोलणं झालं होतं. त्याचं शतक होत नसल्याने तो प्रचंड उदास होता. यावेळी मी त्याला त्याच्या कामगिरी खूश आहे. त्याने वर्ल्ड कपमधील धावांनी देखील खूश आहे, असे सांगत त्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

advertisement

खरं तर वैभवने एकदा सांगितले होते की त्याच्या वडिलांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे.मी कितीही धावा केल्या तरी ते संतुष्ट होत नाही.पण आज वडिलांच्या एका फोन कॉलने वैभवला दिलासा मिळाला आणि त्याने फायनल सामन्यात 80 बॉलमध्ये 175 धावांचा दीड शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते. याच त्याच्या वादळी खेळीमुळे भारत 411 धावांपर्यंत मजल मारू शकला होता. आणि नंतर इंग्लंडचा 100 धावांनी पराभव झाला. त्यामुळे वैभवला आलेल्या त्या वडिलांच्या एका फोन कॉलने मॅच फिरली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

तसेच जास्त षटकार आणि चौकार मारत असल्याने वडिलांनी त्याला एक-दोन धावा काढण्याचाही सल्ला दिला होता. पण जेव्हा षटकार मारल्यामुळे धावा निघतात मग सिंगल धाव घेऊन वेळ कशाला घालवू असे वैभव त्याच्या वडिलांना म्हणाला होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : एका कॉलने वर्ल्ड कपची अख्खी मॅच फिरली, वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी मॅचनंतर सगळंच सांगितलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल