TRENDING:

ICC World Cup 2023 : रोहित-विराट सोबत हे 2 भारतीय खेळाडू उडवणार पाकिस्तानाची दाणादाण, नेमकं काय होणार?

Last Updated:

आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषकात सात वेळा आमनेसामने आले आहेत. प्रत्येक वेळी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान
advertisement

वाराणसी, 13 ऑक्टोबर : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तानगच्या संघावर मात केल्यानंतर आता बारतीय संघाचा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.

रोहित शर्माच्या टीमचा पाकिस्तानसोबत 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे. भारत पाकिस्तानचा सामना हा विश्वचषकातील सर्वात हाय होल्टेज सामना मानला जातो. काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी या सामन्यासंदर्भात भाष्य केले आहे.

advertisement

ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरतील. केवळ पाकिस्तानविरोधातच नाही तर संपूर्ण विश्वचषकादरम्यान या खेळाडूंची कामगिरी चांगली होईल, असे ते म्हणाले.

विराट-रोहित देणार दणका -

संजय उपाध्याय पुढे म्हणाले की, विराट कोहलीची वृष राशि आणि रोहिणी नक्षत्र आहे. या व्यतिरिक्त शनिची स्थितिसुद्धा खूप चांगली आहे आणि तो आपल्या राशीत मूल त्रिकोणमध्ये आहे. अशात तो विश्वचषकात दमदार फलंदाजी करेल. सोबत सांगितले की, विराट कोहलीची कामगिरी याआधीही चांगली होती. यानंतरही ही कामगिरी आता चांगली होणार आहे. यासोबतच कर्णधार रोहित शर्मासुद्धा स्वाती नक्षत्र आणि शनिमुळे मैदानात विरोधी संघाला दणका देतील.

advertisement

मोहम्मद सिराजही चमकणार -

पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, श्रेयस अय्यरची राशी कुंभ आणि शनि मूल त्रिकोणात आहे. त्यामुळे त्याची कामगिरीही उत्कृष्ट असेल. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसुद्धा चमकदार अशी कामगिरी करणार आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वविजेते बनवण्यात हे खेळाडू महत्त्वाची भूमिका निभावतील. आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषकात सात वेळा आमनेसामने आले आहेत. प्रत्येक वेळी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि कांद्याच्या दरात पुन्हा घट, कपाशीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

(सूचना-ही बातमी धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषावर आधारित आहे. न्यूज 18 याबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICC World Cup 2023 : रोहित-विराट सोबत हे 2 भारतीय खेळाडू उडवणार पाकिस्तानाची दाणादाण, नेमकं काय होणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल