20 व्या ओव्हरवेळी हेडचा कॅच स्लिपला गेला
काल 20 विकेट्स पडल्यानंतर ट्रेव्हिस हेडने सामन्याची सुत्र हातात घेतली. त्याने कांगारूंची एक बाजू लावून धरली. नाईट वॉचमन म्हणून आलेला बोलंड लगेच आऊट झाला. त्यानतंर स्मिथने 24 धावांची खेळी केली पण त्याला मैदानात जास्त वेळ टिकता आलं नाही. त्यानंतर हेडने आक्रमक अंदाजात बॅटिंग सुरू केली. त्यावेळी 20 व्या ओव्हरवेळी हेडचा कॅच स्लिपला गेला.
advertisement
आऊट की नॉट आऊट?
पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रुटच्या हातात बॉल गेल्यावर रुटने पुढे हात सरसावले अन् कॅच टिपला पण त्यावेळी बॉल बाऊन्स झाल्याने आऊट की नॉट आऊट याचा निर्णय अंपायर्सला देणं देखील अवघड झालं होतं. हेडला आऊट दिल्याने ऑस्ट्रेलियाने नाराजी व्यक्त केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
पाहा Video
दरम्यान, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा. ट्रेव्हिस हेड आऊट आहे की नॉटआऊट.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, स्कॉट बोलँड.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), विल जॅक्स, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.
