अंपायरसोबत वाद घातला
कालच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू आऊट असताना देखील त्याला नॉटआऊट करार देण्यात आलं होतं. यानंतर कॅप्टन जितेश शर्माने अंपायरसोबत वाद घातला होता. त्यामुळे मैदानात मोठा राडा झाला होता. पाकिस्तान-ए संघाच्या डावातील १० वा ओव्हर सुयश शर्मा टाकत होता. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर माज सदाकतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. नमन धीरने तो कॅच पूर्ण करताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली, कारण त्यांना वाटले की फलंदाज बाद झाला आहे.
advertisement
वैभवची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद
भारतीय खेळाडूंनी अंपायरसोबत वाद घातल्यानंतर जितेश शर्मा याने वाद घातला. त्याचवेळी वैभव सूर्यवंशी याची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. 14 वर्षांच्या वैभवचा चेहरा पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. वैभवचा भोळाभाबळा चेहरा पाहून अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पाकिस्तानविरुद्ध भारत अ (प्लेइंग इलेव्हन) : वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा.
