वसीम अक्रम एशिया स्पोर्टशी बोलत होता. यावेळी ओव्हल टेस्ट सामन्यातील शेवटच्या थरारावर बोलताना वसीम अक्रम म्हणतो,'मी काम नसताना क्वचितच क्रिकेट पाहतो, पण मी शेवटच्या दिवसासाठी खूप उत्सुक होतो. कारण मोहम्मद सिराज भूकेने आणि जोशाने भरलेला होता, तो अविश्वसनीय प्रयत्न होता.5 कसोटी सामन्यांमध्ये जवळजवळ 186 ओव्हर टाकणे आणि तरीही शेवटच्या दिवशी तेवढेच आक्रमक असणे हे उल्लेखनीय सहनशक्ती आणि मानसिक ताकद दर्शवते. तो भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. हे एका लढाऊ खेळाडूचे लक्षण आहे,अशा शब्दात त्यांनी त्याचे कौतुक केले होते.
advertisement
विशेष म्हणजे वसीम अक्रम हे मोहम्मद सिराजचं कौतुक करताना जसप्रीत बुमराहचं नाव विसरले आहे. जसप्रीत बुमराहने देखील इंग्लंड विरूद्ध तीन कसोटी मालिकेत चांगली गोलंदाजी केली. पण तो ज्या सामन्यात खेळला त्या सामन्यात टीम इंडियाला विजयच मिळवता आला नाही.त्याने देखील तीन सामन्यात असंख्य ओव्हर टाकल्या पण त्याचे कौतुकत करण्यात आले नाही.तसेच भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व आता मोहम्मद सिराज करणार असं विधान करून त्यांनी बुमराहला डिवचलं.
दरम्यान शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, वसीम अक्रमने भारताला विजयाची 60 टक्के संधी दिली होती, परंतु सिराजने पहिला ब्रेकथ्रू देताच सामन्याचा मार्ग बदलला. ख्रिस वोक्सची दुखापत आणि इंग्लंडच्या खालच्या फळीची कमकुवतपणा लक्षात घेऊन, सिराजने पूर्ण जोमाने आक्रमण सुरू ठेवले आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सिराजने मालिकेत एकूण 23 बळी घेतले, ज्यामध्ये ओव्हल कसोटीत 9 बळी घेण्याची त्याची शानदार कामगिरी देखील समाविष्ट होती. त्याच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा मजबूत फलंदाजी क्रम कोसळला आणि भारताने फक्त 6 धावांच्या कमी फरकाने विजय मिळवला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
सिराजच्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो केवळ 'सपोर्ट बॉलर' नाही तर टीम इंडियाच्या आक्रमणाचा नेता आहे. येत्या काळात, विशेषतः जेव्हा संघ परदेशी भूमीवर विजय मिळवण्याच्या शोधात असतो तेव्हा त्याच्या लढाऊ वृत्तीचा भाव भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.