इरफान पठाणला विश्वास आहे की शुभमन गिल टीम इंडियाचा पुढचा विराट कोहली बनू शकतो. गिल सध्या भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार आहे आणि त्याला टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. त्याने टेस्टमध्ये नंबर 4 चे स्थान मिळवले आहे, ज्यावर विराट कोहली पूर्वी खेळायचा.
इरफान पठाणने विराट कोहलीची तुलना त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकरसोबत कशी केली जायची? हे सांगितलं. त्याचप्रमाणे शुभमन गिलची तुलना आता विराट कोहलीशी केली जात आहे.
advertisement
'गिल खूप प्रतिभावान आहे. तुलना नेहमीच केली जाईल. विराटची तुलना सचिनसोबत केली जात होती, ज्याने 25-30 हजार रन केल्या आहेत. मला वाटते की गिलमध्येही असंच करण्याची क्षमता आहे. तो वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळू शकतो. क्रिकेटपटू म्हणून त्याला जितक्या जास्त जबाबदारी आणि आव्हाने मिळतील तितका तो चांगला होईल. मी त्याला नेहमीच क्रिकेटसाठी तयार असल्याचे पाहिले आहे', असं इरफान पठाण म्हणाला आहे.
इरफान पठाणच्या आधी इंग्लंडचा दिग्गज स्पिन बॉलर मोंटी पानेसर यांनी शंका व्यक्त केली होती की शुभमन गिल टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा घेऊ शकेल. दुसरीकडे, कर्णधार झाल्यानंतर शुभमन गिलने सांगितले की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
इरफान पठाणचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा, वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार असूनही, शुभमन गिलला 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममधून वगळण्यात आले आहे. टी-20 टीमचा उपकर्णधार असूनही गिलला वर्ल्ड कप टीममधून वगळण्यात आले आहे.
