संजू नाराज का झाला?
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्याचा निर्णय का घेतला? याबद्दलची माहितीही समोर आली आहे. संजूचे राजस्थान रॉयल्ससोबत बरेच मतभेद झाले, पण जॉस बटलरला रिलीज करण्याच्या निर्णयाने हे वाद आणखी वाढले. काहीच दिवसांपूर्वी संजू सॅमसनने बटलरला रिलीज करणं आव्हानात्मक होतं, अशी प्रतिक्रिया दिली होती.
'बटलरला सोडणं हा माझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक निर्णय होता. इंग्लंड सीरिजदरम्यान आम्ही जेवायला भेटलो, तेव्हाही मी हा निर्णय पचवू शकलो नाही, असं बटलरला सांगितलं. मला आयपीएलमधील एक गोष्ट बदलायला सांगितली, तर मी प्रत्येक 3 वर्षांनी खेळाडू रिलीज करण्याचा नियम बदलेन', असं संजू सॅमसन स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना म्हणाला होता. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या मागच्या मोसमाआधी बटलरला रिलीज करून शिमरन हेटमायरला रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
काहीच दिवसांपूर्वी संजू सॅमसनने आर.अश्विनच्या युट्युब चॅनलला मुलाखत दिली, ज्यात त्याने राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. उलट संजूने या मुलाखतीमध्ये राजस्थान रॉयल्सचं कौतुक केलं. राजस्थान रॉयल्स माझ्यासाठी विश्व आहे, याशिवाय त्याने वैभव सूर्यवंशीचंही कौतुक केलं. आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीमुळेच संजूला त्याची ओपनिंगची जागा सोडावी लागली होती.