टीमचं नाव बदलणार?
आदित्य बिर्ला ग्रुपने टीम विकत घेतली असली तरी टीमची मालकी आयपीएल 2026 नंतर त्यांच्याकडे जाणार आहे. आरसीबीची विक्री झाल्यानंतर आता टीमचं नावही बदललं जाणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांनी सोशल मीडियावर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अनन्या बिर्ला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट रिपोस्ट केली आहे, ज्यात टीमचं नाव बदललं जाणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.
advertisement
आर्यमन बिर्ला आरसीबीचे नवे चेयरमन
आदित्य बिर्ला ग्रुपचे डायरेक्टर आर्यमन विक्रम बिर्ला आरसीबीचे नवे चेयरमन होतील, तर टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यन गजवानी व्हाईस चेयरमनच्या भूमिकेत दिसतील. आर्यमन बिर्ला हे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमचा भाग होते, तसंच त्यांनी मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीही खेळली, पण वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आर्यमन बिर्ला यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018 साली आयपीएल टीममध्ये असलेल्या आर्यमन बिर्ला यांनी पुढच्या 8 वर्षांमध्ये आयपीएल टीम विकत घेतली आहे.
विजय माल्ल्या पहिले मालक
आरसीबी फ्रॅन्चायजी बोली प्रक्रियेमार्फत उद्योजक विजय माल्ल्या यांनी विकत घेतली होती, ज्यात विराट कोहलीला टीममध्ये घेतलं गेलं. विजय माल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरिट्स कंपनीचं नियंत्रण काही काळानंतर डियाजियोकडे गेलं, त्यानंतर डियाजियोकडे आरसीबीची मालक झाली. आता डियाजियोनेही आरसीबीची विक्री केली आहे.
