सरिता शर्मा असं या महिलेचं नाव आहे. मुलगी अनिका हिला गंभीर आजार झाला आहे, या आजारासाठी अमेरिकेहून इंजक्शन मागवावं लागणार आहे, ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. आतापर्यंत मी थोडे थोडे करून 4.1 कोटी रुपये जमा केले आहेत, पण वेळ निघून चालली आहे. मला क्रिकेटपटूंकडून मदतीची अपेक्षा आहे. विराट आणि रोहित मला मदत करतील, अशी अपेक्षा आहे, असं ही महिला म्हणाली आहे.
advertisement
मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी रोहित शर्मा ज्या हॉटेलमध्ये होता, त्या हॉटेलमध्ये गेले. भावनेच्या भरात मी रोहित शर्माचा हात पकडला. मॅचवेळी मी डोनेशन कॅम्पही लावला होता, पण तो पुरेसा नव्हता, अशी प्रतिक्रिया महिलेनी दिली.
महिलेने माफी मागितली
महिलेने तिच्या या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. विराट आणि रोहितने माझी स्थिती समजून घ्यावी. मी त्याच्या जवळ सेल्फी घ्यायला गेले नव्हते, तर मुलीचा जीव वाचवण्यासाठी गेले होते. मी अधिकाऱ्यांचीही माफी मागते. काय करायचं ते मला समजत नव्हतं, असं वक्तव्य महिलेने केलं आहे.
सिक्युरिटीला चकवा दिला
हॉटेलमध्ये झालेल्या या गोंधळाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये महिला सिक्युरिटीला चकवा देऊन रोहित शर्माचा हात पकडत असल्याचं दिसत आहे. याआधी हीच महिला युट्युबर एलविश यादव याच्याकडेही मदत मागण्यासाठी गेली होती.
