ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 46 रन केले. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या स्टार्कने 27 आणि नवव्या क्रमांकाच्या पॅट कमिन्सने 22 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. मार्को यानसन, केशव महाराज आणि तबरेज शम्सीला प्रत्येकी 2-2 आणि लुंगी एनगिडीला 1 विकेट मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर क्विंटन डिकॉकच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 311 रन केल्या. दक्षिण आफ्रिकेचे ओपनर क्विंटन डि कॉक आणि टेम्बा बऊमा यांच्यात 108 रनची पार्टनरशीप झाली. तर मार्करमने 56 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि मॅक्सवेलला 2 तर हेजलवूड, कमिन्स आणि झम्पा यांना 1-1 विकेट मिळाली.
advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दणदणीत विजयासोबतच दक्षिण आफ्रिका पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दोन सामन्यांमध्ये दोन विजयांसह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत, तर ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.