आज आपण वर्ल्ड कप ट्रॉफीबाबत एक रंजक बाब जाणून घेणार आहोत. वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढतच चालली आहे. क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपशी संबंधित बरीच माहिती हवी असते. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला खरी ट्रॉफी दिली जाते की नाही, हे आपण जाणून घेणार आहोत.
वर्ल्ड कप ट्रॉफीबद्दल प्रश्न
गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रत्येक वेळी चर्चेचा विषय राहिला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला कोणती ट्रॉफी मिळते हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे? जी ट्रॉफी विविध शहरांमध्ये प्रदर्शित केली जाते, तीच ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते का? त्याचं उत्तर काय आहे ते जाणून घेऊयात.
advertisement
खरी ट्रॉफी कुठे जाते?
वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खरी ट्रॉफी संपूर्ण टूर्नामेंटदरम्यान ठेवली जाते, जेव्हा एखादा संघ वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा त्याला ही ट्रॉफी दिली जाते, जिच्याबरोबर सर्व खेळाडू आणि टीम फोटो काढतात, पण शेवटी टीम जी ट्रॉफी त्यांच्या देशात घेऊन जाते ती एक प्रतिकृती असते, खरी नाही. वर्ल्ड कप सारखी दिसणारी रेप्लिका ट्रॉफी टीम स्वतःसोबत आपल्या देशात घेऊन जाते. यानंतर खरी वर्ल्ड कप ट्रॉफी आयसीसीच्या हेडक्वार्टरमध्ये परत पाठवली जाते.
त्याचप्रमाणे दरवेळी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी एक ट्रॉफी तयार केली जाते, जी हुबेहूब वर्ल्ड कप ट्रॉफीसारखी दिसते. ती बनवण्यासाठी एक खास टीम आहे, जी सुरेख नक्षीकाम करून ट्रॉफीची प्रतिकृती तयार करते. यामध्ये चांदी आणि सोन्याचाही वापर करण्यात आलेला असतो. या ट्रॉफीचं वजन सुमारे 11 किलोपर्यंत असते.