TRENDING:

2023 च्या वर्ल्ड कपला सुरुवात! वाचा टीम इंडियाचा ड्रेस कोणत्या फॅब्रिकपासून बनतो?

Last Updated:

योग्य कापडाच्या साह्याने बनवलेला युनिफॉर्म क्रिकेटसह सर्वच खेळांच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी साह्यभूत होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 2019च्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2023च्या वर्ल्ड कपची पहिली मॅच न्यूझीलंड आणि इंग्लंड या टीम्समध्येच झाली. त्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 विकेट्सनी हरवून त्या पराभवाचा वचपा काढला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या टीम्समध्ये 8 ऑक्टोबर रोजी होणार असलेल्या मॅचची प्रतीक्षा भारतीयांना आहे. टीम इंडिया शानदार निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाची टीम पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खेळायला उतरेल. टीम इंडियाच्या ड्रेसचा रंग आणि फॅब्रिक अर्थात कापडामध्ये वेळोवेळी बदल होत राहतो. या वेळी टीम इंडियाचा ड्रेस कोणत्या फॅब्रिकपासून बनवला आहे, त्याबद्दल जाणून घेऊ या.
वर्ल्ड कप 2023
वर्ल्ड कप 2023
advertisement

स्पोर्ट्स जर्सी आणि युनिफॉर्ममध्ये वापरलं जाणारं कापड विशेष प्रकारचं असतं. युनिफॉर्म बनवताना कापडाची निवड खेळ, खेळाडू आणि हवामानाचा विचार करून केली जाते. कापड घाम शोषून घेणारं असावं, तसंच धुतल्यानंतर लवकर सुकणारं असावं, असा विचार केला जातो. धावताना, उड्या मारताना ते सहज ताणलं जायला हवं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आरामदायक असायला हवं. योग्य कापडाच्या साह्याने बनवलेला युनिफॉर्म क्रिकेटसह सर्वच खेळांच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी साह्यभूत होतो.

advertisement

टीम इंडियाचा युनिफॉर्म

वर्ल्ड कप 2023साठी टीम इंडियाचा ड्रेस पॉलि-कॉटन म्हणजेच कॉटन आणि पॉलिएस्टरच्या मिश्रणातून बनलेल्या कापडापासून तयार करण्यात आला आहे. पॉलि-कॉटनमध्ये (पीएमसी) 65 टक्के कापूस आणि 35 टक्के पॉलिएस्टर असतं. पीएमसी हे कापड शुद्ध कापसापेक्षा जास्त मजबूत आणि त्वचेसाठी जास्त आरामदायक असतं. ते वजनाला हलकं असतं. पीएमसीपासून बनलेल्या कापडातून हवा सहज खेळती राहते. त्यामुळे खेळाडूंना उकाड्याच्या काळात खेळण्यास त्रास होणार नाही. या कापडाची चमक सुती कापडापेक्षा जास्त असते. या फॅब्रिकचा उपयोग फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल या खेळांच्या युनिफॉर्मसाठीही केला जातो. पीएमसीसाठी जीएसएम 160 ते 170 आहे.

advertisement

डॉट निट फॅब्रिक

स्पोर्ट्स जर्सी बनवण्यासाठी डॉट निट फॅब्रिकचा वापर सर्वाधिक होतो. ते शंभर टक्के पॉलिएस्टरपासून बनलेलं असतं. धागे विणून कापड बनवलं जातं. ते वजनाला हलकं असतं, हवा खेळती राहते आणि घामही शोषला जातो. या फॅब्रिकचा वापर क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटनच्या खेळाडूंची स्पोर्ट्स जर्सी बनवण्यासाठी केला जातो.

उकाड्याच्या प्रदेशात....

राइस निट फॅब्रिक नावाचं एक कापड अशतं. त्याचं हे नाव त्याच्या प्रिंट स्ट्रक्चरमुळे पडलं आहे. त्यावर दिसणारे डॉटस तांदळासारखे दिसतात. हे कापड 160-170 जीएसएमचं असतं. त्याचं वजन हलकं असतं. हरम हवामानात ते आरामदायक असतं. त्यामुळे त्याचा सर्वाधिक वापर फुटबॉल आणि हॉकी प्लेयर्सची जर्सी बनवण्यासाठी केला जातो. त्याची चमक पॉलि-कॉटन आणि डॉट निट फॅब्रिकपेक्षा कमी असते.

advertisement

एअर निट फॅब्रिक

एअर निट किंवा एअर मेश फॅब्रिक वजनाला खूप हलकं असतं. या फॅब्रिकचा वापर वेगवेगळ्या पातळीवर क्रिकेट आणि हॉकी प्लेयर्सची जर्सी बनवण्यासाठी केला जातो. एअर मेश फॅब्रिकला सर्वसाधारणपणे तीन थर असतात. ते पॉलिएस्टरपासून बनलेले असतात. वरचा, मधला आणि खालचा थर यांमध्ये हवा असल्याने त्याला एअर निट फॅब्रिक असं म्हटलं जातं. त्याशिवाय लेयर्समध्ये विणलेलं असल्याने त्याला सँडविच फॅब्रिक असंही म्हटलं जातं. हे कापड मुलायम आणि टिकाऊ असतं. त्याचा वापर बॅग, खुर्ची, बूट, चपला, सीट कव्हर यांसाठीही केला जातो.

advertisement

स्पोर्ट्स जर्सीसाठी विणलेल्या फॅब्रिकचे फायदे

स्पोर्ट्स जर्नी किंवा युनिफॉर्मसाठी विणलेल्या फॅब्रिकचा वापर अनेक कारणांनी केला जातो. ते इंटरलॉक डिझाइन पॅटर्नमुळे सहजपणे ताणले जातात. ते घातल्यानंतर खेळाडूला धावणं, उड्या मारणं वगैरेंसाठी सुलभता येते. लवचीक असल्याने ते कापड फाटत नाही. रिंकल फ्री अर्थात त्यावर सुरकुत्याही पडत नाहीत. विणलेलं कापड मुलायम असतं. त्वचेला त्रासदायक नसतं. तसंच, या कापडाचे ड्रेसेस धुणं, सुकवणं आणि मेंटेन करणं सोपं असतं; मात्र विणलेल्या कापडाची लवचीकता त्याला शिवून आकार देण्याचं काम अवघड करते.

डायगनल फॅब्रिक

डायगनल फॅब्रिक 23-240 जीएसएमचं असतं. त्याचं वजन विणलेल्या कापडापेक्षा जास्त असतं. तसंच, त्यातून हवा खेळती राहणं जवळपास अशक्य असतं. ते कापड अधिक टिकाऊ आणि चमकदार असतं. म्हणून ते बेसबॉल, क्रिकेट, फुटबॉलसह अेक खेळांमधल्या पँट्स शिवण्यासाठी वापरलं जातं. या कापडात सरळ रेषांचा डायगनल पॅटर्न असतो. हे कापड नरम असतं. म्हणून त्याचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.

साइडनेट डिझाइनसाठी पॉलीमेश फॅब्रिक

पॉलीमेश फॅब्रिक हे 100 टक्के पॉलिएस्टरपासून विणलेलं कापड असतं. हे कापड वजनाला खूप हलकं असतं. त्याचा वापर स्पोर्ट्स जर्सीमध्ये साइडनेट डिझाइनसाठी केला जातो. हे कापड उन्हाळ्यात आरामदायक ठरतं. पॉलीमेश फॅब्रिक हायड्रोफोबिक आणि टिकाऊ असतं. जाळीदर कपड्यांचा वापर खेळ, कॅम्पिंग, शिकार आणि मासेमारीच्या प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. धाग्यांच्या साह्याने हे कापड तयार केलं जातं. हे धागे धातू किंवा अन्य कोणत्या तरी लवचिक साहित्यापासून तयार केले जातात. खास पॅटर्नमध्ये विणलेल्या धाग्यांपासून जाळीसारखी रचना तयार होते. जाळीदार कापड खूप टिकाऊ, मजबूत आणि लवचीक असतं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
2023 च्या वर्ल्ड कपला सुरुवात! वाचा टीम इंडियाचा ड्रेस कोणत्या फॅब्रिकपासून बनतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल