नॅट साईव्हर ब्रंटच्या या शतकामुळे मुंबई इंडियन्सने आरसीबीवर शेवटच्या ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला आहे. नॅट साईव्हर ब्रंटने 57 बॉलमध्ये 16 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने नाबाद 100 रन केल्या, याशिवाय हिली मॅथ्यूजने 56 रनची खेळी केली. या दोघींच्या बॅटिंगमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 199 रन केले.
मुंबईने दिलेल्या 200 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात अत्यंत खराब झाली. 35 रनवरच आरसीबीने त्यांच्या 5 विकेट गमावल्या होत्या. पण रिचा घोषने 50 बॉलमध्ये 90 रनची वादळी खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. रिचा घोषला नदिने डि क्लार्कनेही साथ दिली, तिने 28 रनची खेळी केली.
advertisement
रिचा घोषने एकहाती किल्ला लढवल्यामुळे हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झाला. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने 3 विकेट घेतल्या तर शबनीम इस्माइल आणि अमालिया केर यांना 2-2 आणि अमनजोत कौरला 1 विकेट मिळाली.
मुंबई दुसऱ्या क्रमांकावर
आरसीबीविरुद्धच्या या विजयासह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईने 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला गुजरातविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. मुंबईसह दिल्ली आणि गुजरात प्रत्येकी 6 पॉईंट्सवर आहेत, पण दिल्ली आणि गुजरातने मुंबईपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. तर यूपी वॉरियर्स 6 सामन्यात 2 विजय आणि 4 पराभवांसह शेवटच्या म्हणजेच पाचव्या क्रमांकावर आहेत. आरसीबी 7 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 2 पराभवांसह आधीच प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाली आहे.
